malwadi notes.jpg 
नाशिक

लॉकडाऊनमध्ये साक्षात चमत्कार! शेतात चक्क पैशाचा पाऊस?? शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / दहीवड : माळवाडी (ता. देवळा) येथील धवळखडी मंदिर रस्त्यावर शंभर, दोनशेच्या एकूण दोन हजार रुपयांच्या नोटा आढळल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नोटा 50 ते 60 फुटांपर्यंत पसरलेल्या अवस्थेत आढळल्याने हे नेमके आहे काय, असा प्रश्‍न शेतकरी, ग्रामस्थ, शेतमजुरांसमोर उभा आहे. 

असा घडला प्रकार
गुरुवारी (ता. 30) सायंकाळी शेतीकामे आटोपून घराकडे येत परतणाऱ्या शेतकरी व मेंढपाळांच्या निदर्शनास हा प्रकार आला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. याबाबत पोलिसपाटील सुनील वाघ यांनी देवळा पोलिसांना माहिती दिली. हवालदार राठोड व तलाठी पुरकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन नोटांची पाहणी केली. नागरिकांना घाबरण्याचे काहीही कारण नाही, असा विश्‍वास दिला. मात्र, नोटांना हात लावण्यासाठी कुणीही धजावले नाही. दरम्यान, पोलिसांनी सॅनिटायझर, हॅंडग्लोव्हज व चिमट्याच्या सहाय्याने त्या नोटा ताब्यात घेतल्या. कोरोना विषाणूची दहशत सर्वत्र पसरली असल्याने जाणीवपूर्वक नोटा टाकण्याचे काम अज्ञात व्यक्तीने केले असावे, अशी चर्चा सुरू आहे. नोटा बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त

कसमादे पट्ट्यात दुसरा प्रकार 
कसमादे परिसरातील हा दुसरा प्रकार आहे. 11 एप्रिलला सौंदाणे (ता. मालेगाव) येथेही अशाच प्रकारे नोटा रस्त्यावर आढळल्या होत्या.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT