Rural Police Recruitment esakal
नाशिक

Rural Police Recruitment : आजपासून पोलीस शिपाईपदासाठी मैदानी चाचणी; 984 उमेदवारांची दांडी

नरेश हाळणोर

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर चालक पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेंतर्गत मैदानी चाचणी सुरू आहे. यासाठी गेल्या दोन दिवसात झालेल्या मैदानी चाचणीतून १ हजार २२ उमेदवारांनी मैदानी चाचणीची पात्रता पार केली आहे.

यामध्ये ७० महिला उमेदवारांचाही समावेश आहे. तर, १५ चालक पदासाठी राबविण्यात आलेल्या या मैदानी चाचणीला ९८४ उमेदवारांनी दांडी मारली. (Rural Police Recruitment Field test for police constable from today Nashik News)

आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गेल्या दोन दिवसांपासून १५ पोलीस वाहन चालक पदासाठीच्या मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू होती. यासाठी २ हजार १०० उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. सोमवारी (ता. २) पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांना आवेदन पत्र पाठविण्यात आलेले होते.

त्यापैकी फक्त ४५२ उमेदवार या मैदानी चाचणीसाठी उपस्थित झाले असून, ते सर्वच चाचणीमध्ये पात्र ठरले आहेत. तर, मंगळवारी (ता. ३) एक हजार १०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पाचारण करण्यात आले असता, त्यापैकी केवळ ६६४ उमेदवार उपस्थित झाले. यातून दिवसभर राबविण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये ५७० उमेदवार पात्र ठरलेले आहेत.

या दोन दिवसात १ हजार २२ उमेदवार हे चालक पदाच्या मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरले असून, या उमेदवारांची नियोजित वेळेनुसार लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान, बुधवारपासून (ता.४) १६४ पोलीस शिपाई पदासाठीच्या मैदानी चाचणीला प्रारंभ होणार आहे. यासाठी २१ हजार ऑनलाईन अर्ज आलेले आहेत.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

७० महिलांनी दिली मैदानी चाचणी

दरम्यान, पोलीस वाहन चालक पदासाठी भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी ७० महिलांचीही मैदानी चाचणी घेण्यात आली. चालक पदासाठी महिलांची सहभाग घेतल्याने येत्या काळात पोलीस वाहन चालविता महिला चालकही दिसू शकतात. दरम्यान, या ७० महिलांनी मैदानी चाचणी पार केली असून, त्यांचीही लेखी परीक्षा होणार आहे.

पोलीस अधीक्षक मैदानावरच

गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप हे मैदानावर दुसऱ्या दिवशीही ठाण मांडून होते. प्रत्येक प्रक्रियेवर अधीक्षक उमाप हे बारकाईने लक्ष ठेवून होते. तसेच आलेल्या उमेदवारांना ध्वनीक्षेपकांवर वारंवार सूचना देत होते.

आजपासून शिपाईपदासाठी मैदानी चाचणी

गेल्या तीन वर्षांपासून पोलीस भरतीची प्रक्रिया रखडली होती. गेल्या सोमवारपासून (ता.२) भरतीला प्रारंभ झाला असून, पहिले दोन दिवस चालक पदासाठीची मैदानी चाचणी पार पडली आहे. उद्यापासून (ता. ४) १६४ पोलीस शिपाई पदासाठीच्या मैदानी चाचणीला प्रारंभ होणार आहे. यासाठी २१ हजार अर्ज आलेले असून, उद्या ११०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आलेले आहे.

पोलीस वाहन चालक भरती

एकूण पद : १५

ऑनलाईन अर्ज : २१००

पहिल्या दिवशी आलेले उमेदवार : ४५२

पहिल्या दिवशी पात्र उमेदवार : ४५२

दुसऱ्या दिवशी आलेले उमेदवार : ६६४

दुसऱ्या दिवशी पात्र उमेदवार : ५७०

एकूण पात्र उमेदवार : १०२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT