woman 
नाशिक

पहाटेची वेळ..धावती रेल्वे..अन् प्रसुतिकळांनी बिथरलेली गर्भवती...काय घडले?

हर्षवर्धन बोराडे

नाशिक/ नाशिक रोड : रविवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास मुंबई- वाराणसी विशेष गाडी इगतपुरीला येत होती. यावेळी अचानक गर्भवती प्रियांका यांना प्रसूतिकळा येऊ लागल्या. प्रियांकांना त्या कळा असह्य होत होत्या. पाहा काय घडले पुढे...

वाचा काय घडले?

रविवारी (ता. २६) पहाटे सव्वातीनच्या सुमारास ०१०९३ मुंबई- वाराणसी विशेष गाडी इगतपुरीला येत होती. त्यात प्रवास करणाऱ्या गर्भवती प्रियांका यांना प्रसूतिकळा येऊ लागल्या. इगतपुरी रेल्वेस्थानकाचे उपव्यवस्थापक अवधेश कुमार यांनी प्रियांका यांना तातडीने मदतीसाठी इगतपुरी येथील रेल्वे आरोग्य केंद्राला माहिती दिली. डॉ. ज्योत्स्ना, अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकाने महिलेला इगतपुरी येथेच उतरण्याचा सल्ला दिला. प्रसूतिवेदना होत असलेल्या प्रियांकाने रेल्वे मेडिकल टीमच्या सहाय्याने स्थानकावरच बाळाला जन्म दिला. नवजात बाळ आणि महिलेला प्रसूतिपश्चात उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. 

बाळ व आई सुरक्षित

रेल्वे अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या तातडीच्या मदतीमुळे इगतपुरी स्थानकावर मुंबई- वाराणसी एक्स्प्रेसमधील महिलेची प्रसूती सुखरूप पार पाडली. कर्मचाऱ्यांच्या तातडीच्या मदतीमुळेच बाळ व आई सुरक्षित असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan-Afghanistan War Video: पाकिस्तानात घुसून अफगाणिस्तानचा एअर स्ट्राईक, लष्करी तळ उद्ध्वस्त; व्हिडिओ पुराव्याने खळबळ

Exam Cheating: हद्दच झाली राव! थेट भोंगा लावून सांगितली प्रश्नांची उत्तरे, बारावीच्या परीक्षेत कॉपीचा असाही प्रकार; गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : बदलापूर बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत, आयव्हिएफ सेंटरची तपासणी

Hingoli News: ‘बाबा, माझा पेपर आहे, मला लवकर सलाइन द्या’ मुलाची वडिलांना विनवणी, उपचाराला नेताना मृत्यू

Solapur Couple Case : तरुणाच्या त्रासाला कंटाळून दाम्पत्यानं संपवलं जीवन; 'तो' फोनवरून भेटायला बोलवायचा अन्..., अंथरुणात सापडली मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी

SCROLL FOR NEXT