Dr. Malvika Tambe
Dr. Malvika Tambe esakal
नाशिक

SAFE Seminar : ‘आई-बाबा व्हायचं आहे?’ या आज परिसंवादाला!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गर्भधारणा हा विषय इतका नाजूक आहे, की सहसा या विषयाची आपल्याला कुठे चर्चाच होताना दिसत नाही. पती-पत्नी, त्यांच्या घरचे सदस्य आणि डॉक्टरांच्या क्लिनिकमधल्या त्या छोट्या चेंबरमध्येच याबद्दलची सगळी चर्चा होताना आपल्याला दिसते.

‘आई-बाबा व्हायचं आहे?’ ही चर्चा न होता किंवा स्वप्न न राहता ते प्रत्यक्षात असावं, यासाठी श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनावर आधारित हजारो वर्षांच्या भारतीय आयुर्वेदाने सिद्ध केलेली यशस्वी उपचारपद्धती (सेफ) हा पर्याय घेऊन आलो आहोत.

‘सेफ’ म्हणजे नेमके काय? वंध्यत्व ते नैसर्गिक गर्भधारणेसाठी काय काळजी घ्यायला हवी? या सर्वांचे उत्तर मिळणार आहे, ते शनिवारी (ता. २१) कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा हॉलमध्ये सायंकाळी सहाला डॉ. मालविका तांबे यांच्या परिसंवाद व मार्गदर्शन कार्यक्रमात. परिसंवाद निःशुल्क असून, सर्वांना प्रवेश खुला आहे. (SAFE Seminar Come to seminar today by dr malvika tambe at kusumagraj pratishthan nashik news)

‘सेफ’ हे एका पॅरेंटिंग बडीसारखं आहे, म्हणजे आपला एखादा मित्र जसा आपल्याला आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर मदत करतो, तशाच प्रकारे ‘सेफ’ प्रत्येक दांपत्याला मदत करणार आहे. बाळ होत नसेल, तर त्या अडचणीवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो किंवा काही अडचणी नसल्या; पण व्यवस्थित तयारी करूनही जर बाळ व्हायला प्रयत्न करायचे असतील, तर त्यांच्यासाठीही ‘सेफ’ मदत करू शकतं.

यात बीजशुद्धी ही सर्वांत महत्त्वाची असते. कारण आपले स्पर्म्स व ओवम व्यवस्थित असेल, तर सुदृढ बालक जन्माला येऊ शकतं. यामध्ये काय खायला-प्यायला पाहिजे, यात कोणत्या रसायनांचा फायदा होईल, तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुमच्या दिनचर्येत व आहारात तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, हे सर्व सांगितले जाणार आहे.

खरंतर एकमेकांच्या अनुभवातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळू शकतं आणि बऱ्याच शंकांचं निरसनही होऊ शकतं. त्यामुळे या परिसंवादामध्ये फर्टिलिटीशी संबंधित सगळ्या पैलूंवर चर्चा होणार आहे. या परिसंवादाला बाळ होण्याची इच्छा असणाऱ्या सगळ्याच दांपत्यांनी यायला पाहिजे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

कारण त्यामुळे बऱ्याच गोष्टी समजायला मदत होईल, तसेच त्यांच्या जवळचे लोक, नातेवाईक, मित्रमंडळी यांनीही या परिसंवादाला यायला हरकत नाही. कारण समाजामध्ये कुठे, कोणाला त्रास होत असेल, तर आपल्याला त्याविषयी व्यवस्थित जागरूकता असेल, माहिती असेल, तर कोणाला तरी सल्ला देऊ शकतो.

त्यामुळे प्रत्येकाने या परिसंवादाला आले पाहिजे आणि ‘सेफ’ ही संकल्पना समाजामध्ये रुजू करावी. जेणेकरून पुढे येणारी पिढी ही सुदृढ, निरोगी आणि हुशार असेल.

परिसंवाद अन्‌ मार्गदर्शन

‘संतुलन आयुर्वेद फर्टिलिटी एक्स्पिरिअन्स’ (SAFE) हा कार्यक्रम शनिवारी (ता. २१) सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत नाशिक येथील गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात होणार आहे.

ज्या दांपत्यांना गर्भधारणेसाठी अडचण येत आहे, त्यांनी या परिसंवादाला उपस्थित राहण्याचा नक्की प्रयत्न करावा. प्रवेश विनामूल्य असून, जागा अरक्षित करण्यासाठी तुमचे नाव, नंबर, ई-मेल व्हॉट्सॲप करा. व्हॉट्सॲप नंबर ८३८०००३६९१. अधिक माहितीसाठी भेट द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : मी आतापर्यंत कोणालाही धमकी दिली नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT