Teachers
Teachers esakal
नाशिक

SAKAL Exclusive: केंद्रप्रमुखांसह बहुतांश पदभार ‘गुरूजीं’कडेच; शिक्षक भरतीअभावी ताण वाढला!

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर : शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात राज्यात शिक्षकांची तीस हजारावर पदे रिक्त असून त्याचा ताण गुरूजींवर पडत आहे. सध्या त्यांच्याकडे अशैक्षणिक कामांबरोबर केंद्रप्रमुख पदाचाही अतिरिक्त भार असल्याने शिक्षणाची दैना होत आहे.

राज्यात गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचीही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत.

यातील बहुतांश पदांवर 'गुरूजींचीच' प्रभारी नियुक्ती करून कारभार सुरू आहे. परिणामी वर्ग अध्यापन करून ही पर्यवेक्षीय यंत्रणा काम करते. (SAKAL Exclusive Most of posts including center heads held by Guruji Stress increased due to lack of teacher recruitment nashik)

अगदी प्रत्येक शाळेची माहिती संकलन, ऑनलाईन फिडींगसह वेळोवेळी बैठका, प्रशासकीय आढावा, आलेले पत्र व्हॉट्सप माध्यमातून खालील यंत्रणेपर्यंत पोहचवण्यात प्रभारी केंद्रप्रमुख सर्व राज्यभरात काम बघतात.

आता नव्याने 'नवभारत साक्षरता अभियान' गुरूजींना राबवावे लागत आहे. संघटनांचा एल्गार हे काम हाणून पाडण्यासाठी काय पवित्रा घेतात हे पाहणे उचित ठरेल.

दरम्यान रिक्त पदे भरण्याबाबत केवळ आश्वासने दिली जात असून भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गुरूजनांनी पदरमोड करून लोकसहभागातून, सीएसआर फंडातून शाळांमध्ये बदल घडवले. मात्र रिक्तपदे वाढल्याने अशैक्षणिक कामांसह प्रभारी कार्यभार यामुळे शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विभागात प्रशासन व्यवस्थेवर ताण येतो.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शिक्षकांना अशैक्षणिक कामे देता येत नाही. जनगणना, प्रत्यक्ष निवडणुकीची कामे आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची कामे वगळता कुठल्याही प्रकारची कामे देऊ नये.

मात्र राज्यात महसूल यंत्रणा सातत्याने वेगवेगळ्या कामांना शिक्षकांना वेठीस धरते. अशावेळी 'आरटीई'तील तरतुदीनुसार कळविण्याची, कामाला नाकारण्याची हिंमत शिक्षण विभागाच्या प्रशायकीय यंत्रणेत नाही.

राज्यातील अनेक शाळांमध्ये एक किंवा दोन शिक्षक असल्याने त्यांना बहुवर्ग अध्यापन करावे लागते. अशा परिस्थितीत शालेय पोषण आहार, बांधकामे, बीएलओ मतदार नोंदणी, वेळोवेळी ऑनलाईन माहिती, बैठका, गाव- तालुका पातळीवर उपक्रम अशी कामे वाढत असल्याने शिक्षकांची मानसिकता बिघडत आहे.

गेल्या पाच वर्षातील रिक्त पदे वाढल्याने इतर शिक्षकावर अतिरिक्त ताण येत असल्याने तात्काळ पदे भरण्याची कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे.

दृष्टीक्षेपात शिक्षकांची रिक्त पदे:

मंजूर पदे- २ लाख ४५ हजार ५९१

कार्यरत पदे- २ लाख १४ हजार ११९

रिक्त पदे -३१ हजार ४७२

जिल्हा परिषद शाळा

मंजूर पदे- २१९४२८

कार्यरत पदे-१९९९७६

रिक्त पदे- १९४५२

नगरपरिषद शाळा

मंजूर पदे- ६०३७

कार्यरत पदे- ५२३६

रिक्त पदे- ९०१

"शिक्षक भरतीसाठी यंदा पवित्र पोर्टलमार्फत प्रक्रिया सुरू झाली, मात्र वर्ष उलटूनही अद्याप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तीस हजार पदांची जाहिरात येणे अपेक्षित असताना आतापर्यंत ८ हजार पदेच जाहीर केलेली आहेत. यामुळे आमचा शासनावर रोष वाढण्याआधीच शासनाने तात्काळ पुढील कार्यवाही करावी."- स्नेहल नहिरे, पदव्युत्तर बेरोजगार.

"शिक्षणक्षेत्रात सर्वच पदे रिक्त असल्याने अतिरिक्त ताण शिक्षकांवरच येतो. भरतीसह शिक्षण विभागातील रिक्तपदांवर पदोन्नतीसाठी प्रक्रिया तातडीने करण्याची गरज आहे. अशैक्षणिक कामे अजिबात देऊ नये. अन्यथा सर्व संघटनाना आक्रमक होऊन आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही."- विश्वास निकम, अध्यक्ष, पदवीधर शिक्षक संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar Constituency Lok Sabha Election Result: ना जलील ना खैरे ऑन्ली भूमरे, वादांच्या भोवऱ्यात अडकूनही शिंदे गटाने मिळवला मोठा विजय

Satara Lok Sabha Result: तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हाने शशिकांत शिंदेचा केला घात...साताऱ्यात नेमकं काय घडलं?

Social Media Reaction: निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजार कोसळला; सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

India Lok Sabha Election Results Live : गुजरातच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने पाडले भगदाड! भाजपच्या क्लीनस्वीपच्या स्वप्नाला कोणी फेरले पाणी? 

Maharashtra Lok Sabha Election Results Live : बीडमध्ये पंकजा मुंडे विजयाच्या दिशेने, तब्बल ७५ हजार मतांचं लीड

SCROLL FOR NEXT