MSRTC Bus esakal
नाशिक

SAKAL Exclusive : STचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ; नाशिक विभागात तब्बल 50 टक्के बसची अवस्था खराब

अभिजित सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वारंवार होणाऱ्या एसटी अपघातांमुळे एसटी प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आलीय. ‘सकाळ- साम’ने एसटी बस अपघातांच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नादुरुस्त आणि धोकादायक अवस्थेत असलेल्या एसटी बस रस्त्यावर चालवून प्रवाशांच्या जिवाशी खेळ होत असल्याचे पाहणीत समोर आले आहे. (SAKAL Exclusive MSRTC game with passengers lives 50 percent of buses in Nashik division in poor condition Nashik News)

‘प्रवाशांची लालपरी’ हे बिरुद मिरवणारी एसटी आता जर्जर झालीय. ना चांगले टायर्स, ना वेळेवर मेंटेनन्स... यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी एसटी रस्त्यात कधी बंद पडेल, कधी एसटीचा अपघात होईल, याची शाश्वती नाही. याही अवस्थेतही एसटीचे चालक दररोज रामभरोसे प्रवाशांना सेवा पुरवत आहेत. मात्र कधी काय होईल याचा नेम नाही... नाशिकहून बोरिवलीसाठी निघालेल्या या बसची अवस्था.

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत एसटीच्या दोन घटना घडला. या घटना पाहता एसटी वस्तुस्थिती ‘सकाळ- साम’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात भयावह वस्तुस्थिती समोर आली.
एकट्या नाशिक विभागात नादुरुस्त आणि मोडकळीस आलेल्या ५० टक्के एसटी बस रस्त्यावर धावतायत, ही धक्कादायक माहिती खुद्द एसटी कर्मचाऱ्यांनीच सांगितली. बसच्या पुढील काचा फुटलेल्या, आतील स्पीड, टेंपरेचर, प्रेशर मीटर बंद, खराब टायर्स, निकामी ब्रेक सिस्टीम, बस चालविताना चालकाला बसण्यासाठी व्यवस्थित सीट नाही, प्रवाशांच्या सीटशेजारील काचा खाली पडू नये, यासाठी पॅकिंग लावून केलेली तात्पुरती मलमपट्टी. यामुळे एसटीचा प्रवास धोकादायक बनलाय. मात्र कारवाईच्या भीतीपोटी सर्व परिस्थिती माहीत असताना देखील चालकांसमोर नादुरुस्त एसटी बस चालवण्याशिवाय पर्याय नसल्याचे एसटी चालक सांगतात.

मागच्या काही दिवसांत शिवशाही बसना सातत्याने आग लागल्याच्या घटना घडल्यात. एकट्या नाशिक विभागात मागील नऊ महिन्यांत एसटीला ११९ वेळा अपघात झालेत. यात सहा प्रवाशांना आपले जीव गमवावे लागलेत. मात्र तरीही आजही खिळखिळ्या आणि नादुरुस्त बसच्या माध्यमातून एसटीची प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांच्या या धोकादायक प्रवासाला जबाबदार कोण? एसटी बसच्या अपघातांना जबाबदार कोण? एसटी का करतेय प्रवाशांच्या जिवाशी खेळ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे एसटीची ही परिस्थिती बदलण्यासाठी आता सरकार पातळीवरून प्रयत्न होणे गरजेच आहे.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

बसमधील त्रुटी

- नादुरुस्त आणि मोडकळीस आलेल्या एसटी बस धावतायत रस्त्यावर
- बसच्या पुढील काचा फुटलेल्या
- आतील स्पीड, टेंपरेचर, प्रेशर मीटर बंद
- अस्ताव्यस्त आणि उघड्या पडलेल्या वायरिंग, रिकामे अग्निशमनविरोधी सिलिंडर
- खराब टायर्स, निकामी ब्रेक सिस्टीम, बस चालवताना चालकाला बसण्यासाठी व्यवस्थित सीट नाही
- प्रवाशांच्या सीटशेजारील काचा खाली पडू नये, यासाठी पॅकिंग लावून तात्पुरती मलमपट्टी
- एसटी बसचा नियमित मेंटेनन्स नाही
- खिळखिळ्या आणि नादुरुस्त बसच्या माध्यमातून एसटीची प्रवासी वाहतूक
- प्रवाशांच्या धोकादायक प्रवासाला जबाबदार कोण?
- एसटी बसच्या अपघातांना जबाबदार कोण?
- एसटी का करतेय प्रवाशांच्या जिवाशी खेळ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'IPL 2026 मध्ये बांगलादेशी क्रिकेटपटूंना खेळवाल तर...', शिवसेनेकडून धमकी

DU Recruitment: दिल्ली विद्यापीठात टीचिंग आणि नॉन-टीचिंग पदांसाठी भरती जाहीर; 2.18 लाखपर्यंत पगार; आजच करा अर्ज

Latest Marathi News Live Update : - छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या समर्थकांच्या भाजपविरोात घोषणा अन् युती तोडण्याची मागणी

Thane Politics: “माझी हकालपट्टी करा!”; शिंदेंच्या होमग्राऊंडवरच अस्वस्थता, कैलास शिंदेंच्या पत्राने खळबळ

Dhule Jal Jeevan Mission : धुळ्यात 'जल जीवन मिशन'ची गती मंदावली; २०२५ संपले तरी ५२ टक्के कामे कागदावरच!

SCROLL FOR NEXT