SAKAL Impact independent team total elimination Malegaon electricity theft Home Affairs Orders by Special Inspector General of Police esakal
नाशिक

SAKAL Impact: मालेगाव वीजचोरीच्या समूळ उच्चाटनासाठी स्वतंत्र पथक! गृह मंत्रालयाची दखल; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले आदेश

मालेगाव शहरातील वीजचोरीच्या घटना रोखण्यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने दखल घेतली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नाशिक : मालेगाव शहरातील वीजचोरीच्या घटना रोखण्यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने दखल घेतली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला यासंदर्भात आदेश आल्यावर मालेगावमध्ये वीजचोरी रोखण्यासाठी आता स्वतंत्र पथक स्थापण्यात येणार आहे.

मालेगाव शहराबाहेरील दोन पोलिस अधिकारी आणि दहा पोलिस अंमलदार यांचा या पथकात समावेश असेल. ‘सकाळ’ने या संदर्भातील वृत्त दिले होते.  (SAKAL Impact independent team total elimination Malegaon electricity theft Home Affairs Orders by Special Inspector General of Police nashik)

मालेगाव शहरात एका वर्षात ३१९ कोटी रुपयांची वीजचोरी होत असल्याचे वृत्त दिल्यावर राज्यभर हा विषय चर्चेचा ठरला होता. त्याबरोबरच राष्ट्रीय हरित लवादाने २०१९ मध्ये बंद करण्याचे आदेश दिलेल्या प्लास्टिकच्या कारखान्यांमधूनही वीजचोरी होत असल्याचे ‘सकाळ’ने निदर्शनास आणून दिले होते.

या संपूर्ण अवैध प्रकाराची राज्याच्या गृह विभागाने दखल घेतली आहे. मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनीला अवैध पद्धतीने होणारी वीजचोरी रोखण्यासाठी पोलिसांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी २९ जानेवारीला यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.  

या आदेशानुसार नियुक्त करण्यात येणारे स्वतंत्र पथक मालेगाव पॉवर सप्लाय लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी नियमित समन्वय ठेवेल. या पथकाने दोन पाळ्यांमध्ये काम करावे.

ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी मालेगाव अप्पर पोलिस अधीक्षकांना हे मनुष्यबळ मालेगावबाहेरून उपलब्ध करून द्यावे. या स्वतंत्र पथकावर मालेगाव अप्पर पोलिस अधीक्षकांचे थेट नियंत्रण असेल.

वीजचोरीविरुद्ध कायदेशीर कारवाई करून दोषारोपाचे तपास ६० दिवसांच्या आत न्यायालयात दाखल करावे. यातून वीजचोरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तातडीने कार्यवाहीच्या सूचना पोलिस प्रशासनाने दिल्या आहेत.

स्वतंत्र पथकाची कामगिरी आणि वीजचोरीचे दाखल गुन्ह्यांचा अहवाल दर १५ दिवसांनी सादर करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.   

वीजचोरीचे फंडे अन हतबल कंपनी

मालेगावमध्ये वीजचोरांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. रिमोटद्वारे छेडछाड, रात्री मीटर बंद ठेवणे, मीटर क्लोन करून चोरी करणे, मीटर रीडिंगच्या काळात क्लोन केलेले मीटर बसविणे अशा पद्धतीने सर्रासपणे वीजचोरी होते.

अनधिकृत प्लास्टिकचे कारखाने रात्रीच्या वेळी आकडे टाकून पूर्ण क्षमतेने वीजचोरी करून चालविले जातात. या सगळ्या गैरप्रकारांमुळे मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीस मोठे नुकसान होत आहे. हे सगळे प्रकार सराईतपणे आणि बिनबोभाटपणे सुरू आहेत.

पोलिसांच्या सहकार्याअभावी वीज कंपनीला कारवाई करणे कठीण बनले. आता स्वतंत्र पथकाकडून कठोर कारवाई होऊन वीजचोरी थांबावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT