nashik crime news esakal
नाशिक

SAKAL Impact : पानटपरीवर इ-सिगारेट, हुक्कासाठीची पाऊचची विक्री; एकाला अटक, प्रतिबंधित साहित्य जप्त

नरेश हाळणोर

नाशिक : शहरातील गंगापूर रोडवर पानटपरीवर ई-सिगारेट व प्रतिबंधित हुक्क्यासाठीचे पाऊच खुलेआम व्रिकी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पानटपरी चालकाला शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली असून, सुमारे ६० हजारांचा प्रतिबंधित माल हस्तगत केला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये नशेचा बाजार सुरू असल्याचे वृत्त ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झाल्याने खडबडून जाग आलेल्या पोलीस यंत्रणेने शहरातील हॉटेल्ससह ठिकठिकाणी छापासत्र सुरू केले आहे. त्यातूनच सदरील यशस्वी कारवाई पोलिसांनी केली. (SAKAL Impact Sales of e cigarettes hookah pouches at Pantapari One arrested banned material seized Nashik news)

ई-सिगारेट

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना गंगापूर रोड परिसरातील पान टपरीवर प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का पाऊचची विक्री होत असल्याची खबर मिळाली होती. यासंदर्भात बागुल यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर रोडवरील नेरलीकर सर्कल येथील जय गणेश स्टोअर्स या पानटपरीवर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. संशयित पानटपरीचालक प्रकाश राजाराम जाधव (३५, रा. एरंडवाडी, पेठफाटा, पंचवटी) यास अटक केली.

त्याच्या टपरीतून परदेशी बनावटीचा तंबाखुयुक्त इलेक्ट्रॉनिक्स हुक्का असलेला प्रतिबंधित ई-सिगारेटची विक्री केली जात होती. यासाठी वापरण्यात येणारे विविध फ्लेवरचे तंबाखुयुक्त ५५ ई-सिगारेट, अल्टीमेट प्री रोल कोन ब्राऊन पेपरचे ५० नग, हुक्का तंबाखुचे वेगवेगळे फ्लेवरचे ३० पाऊच, ३ हुक्का पॉट पाईप, हुक्का पिण्याचे फिल्टर असा सुमारे ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात पोलीस अंमलदार प्रशांत मरकड यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक विष्णु उगले, रवींद्र बागुल, आसिफ तांबोळी, नाझिम खान, प्रशांत मरकड, विशाल देवरे यांनी बजावली आहे.

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

ई-सिगारेट

‘सकाळ’ मालिकेची दखल

शहरात महाविद्यालयीन मुलांमध्ये वाढती व्यवनाधिनता आणि शहरातील नशेचा बाजार यासंदर्भात ‘सकाळ’मधून परखड वृत्तमालिका प्रसिद्ध झाली. या वृत्तमालिकेचा पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गांभीर्याने दखल घेत, शहर गुन्हेशाखेसह पोलिस ठाण्यांना कठोर कारवाईचे आदेश बजावले होते.

शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांनी शहर गुन्हेशाखांना प्रतिबंधित नशेली पदार्थांची विक्रेत्यांविरोधात गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू होती. ठिकठिकाणच्या हॉटेल्स, ढाब्यांसह पानटपरयांवर छापासत्र राबविण्यात आले. येत्या काळात सदरची कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे संकेत उपायुक्त बच्छाव यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eighth Pay Commission Update: आठवा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट! कर्मचाऱ्यांना लवकरच ‘Good News’ कारण...

IND vs NZ 2nd T20I : भारतीय संघाने मोडला पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात २००+ धावांचा 'असा' पाठलाग करणारा जगातील पहिलाच संघ

Pune Election : रूपाली ठोंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे पोलिसांची कठोर कारवाई: वानवडीतील गुन्हेगार महेश शिंदेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

Investment Fraud : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून १५ कोटींची फसवणूक; पुण्यातील व्यापाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT