vishwas-nangre-patil-nashik 123.jpg 
नाशिक

अखेर विश्‍वास नांगरे-पाटील यांनी घेतली दखल! पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाले पीएफचे धनादेश

सतीश निकुंभ

नाशिक / सातपूर : मंगळवारी काही पोलिस कर्मचाऱ्यांनी थेट नियंत्रण कक्षात फोन करून, ‘आयुक्तसाहेब, धनादेश मिळाला नाही तर आत्महत्या करावी लागेल’, असे सांगून थेट पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांचे लक्ष वेधले होते. ​त्यानंतर..

‘आयुक्तसाहेब, धनादेश मिळाला नाही तर आत्महत्या करू

‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता.२६) पोलिस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी कंट्रोलला फोन करून पीएफ मिळावा, यासाठी वरिष्ठाचे लक्ष वेधल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. पोलिसांच्या भविष्यनिर्वाह निधीचे हक्काचे पैसे पोलिस आयुक्तालयातील दप्तर दिरंगाईमुळे मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुषंगाने मंगळवारी काही पोलिस कर्मचाऱ्यांनी थेट नियंत्रण कक्षात फोन करून, ‘आयुक्तसाहेब, धनादेश मिळाला नाही तर आत्महत्या करावी लागेल’, असे सांगून थेट पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांचे लक्ष वेधले होते. या प्रकराची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर स्वतः पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सकारात्मक दखल घेतली. उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले आदींनी पोलिस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कर्मचारी, अधिकारीवर्गाच्या कुटुंबातील सुख-दुःखचा विचार करून त्यांचा हक्काचा भविष्यनिर्वाह निधीचा पैसा त्यांना मिळावा, यासाठी सूचना दिल्या. वरिष्ठांचे आदेश म्हटल्यावर सगळी यंत्रणाच कामाला लागली. 

लाल फितीत अडकलेले प्रस्ताव उघडले
लाल फितीत अडकलेले प्रस्ताव उघडले गेले. ज्यांनी थेट नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून कैफियत मांडली त्यांच्यासह इतरही प्रकरण अडून असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यासह इतर अनेकांच्या कागदपत्रांची पूर्तता करून उपायुक्त पाटील व श्रीमती चौगुले यांनी कर्मचाऱ्यांना धनादेश देण्याची व्यवस्था केली. तत्पूर्वी प्रत्येक पोलिस ठाण्यातून कर्मचाऱ्यांचे किती अर्ज दाखल झाले त्याचा आढावा घेऊन तत्काळ उपायोजना करण्यासाठी गती दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

पोलिस कर्मचाऱ्यांनी मानले आयुक्तांचे आभार

‘आयुक्तसाहेब, पीएफ न मिळाल्यास आत्महत्या करावी लागेल’ या ‘सकाळ’च्या बातमीची पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी गंभीर दखल बुधवारी (ता. २६) पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंड फंडाचे लाल फितीत अडकलेले धनादेश वाटले. चोवीस तासांत पोलिस आयुक्तांनी दखल घेतल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी आयुक्तांचे आभार मानले. 

कामाला अधिक गती देण्याच्या सूचना
काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची अपूर्तता असल्याने त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांनाही पीएफचे धनादेश वाटण्यात आले. तसेच पीएफ धनादेश मिळण्यातील अडचणी दूर करून या कामाला अधिक गती देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT