Veteran actress Smita Jaykar, actress Neha Sonwane, actor sagar korade
Veteran actress Smita Jaykar, actress Neha Sonwane, actor sagar korade esakal
नाशिक

SAKAL Special : सप्तश्रृंग गडावर सेलिब्रिटींचा राबता! पडद्यावरील कलाकारांनाही गडाचे आकर्षण

योगेश सोनवणे

SAKAL Special : शुभ कामनेचा संकल्प, चांगल्या प्रोजेक्टसाठी आशीर्वाद, चित्रपटाच्या यशासाठी देवी चरणी प्रार्थना, तसेच शूटिंगसाठी आवश्यक असलेले योग्य हिलस्टेशन अशा पार्श्‍वभूमीवर सध्या लहान-मोठ्या पडद्यावरील अनेक कलावंतांचा राबता सप्तश्रृंग गडावर बघायला मिळत आहे. (SAKAL Special Celebrity at Saptashringa gad attracts actors on screen nashik news)

आद्यस्वयंभु शक्तीपीठ व समुद्र सपाटीपासून उंचावर असलेले हे मनमोहक व अस्थिर मनाला शांतात देणारे तीर्थक्षेत्र, तसेच पर्यटन स्थळ म्हणून सप्तश्रृंग गडाची ओळख आहे. दिवसागणिक देवीची महती दूरवर पोहचली असल्याने दूरवरून भाविक देवीच्या दर्शनासाठी सातत्याने येत आहेत.

निव्वळ दर्शनाच्या हेतूने येणाऱ्या भाविकांना पर्यटन झाल्याची अनुभूती देणारा सप्तश्रृंगगड परिसर सेवा-सुविधांनी विकसित होतोय. देवीच्या मूर्ती संवर्धनाच्या कामानंतरदेखील देवीचे नवीन रूप डोळ्यात साठविण्यासाठी गर्दी झाल्याचे बघायला मिळाले.

श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमुळे भाविकांची संख्या वाढत आहे. पायरी मार्गाने मंदिरात जाऊ न शकणाऱ्यांसाठी फ्युनिक्युलर रोपवे हा पर्याय उपलब्ध झाल्याने दिव्यांग भाविकदेखील देवी चरणी नतमस्तक होत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चित्रपट सृष्टीलाही भूरळ

बऱ्याच कलावंतांची साडे तीन शक्तिपीठाचे दर्शन घेण्याची इच्छा असते. एखादा नवीन चित्रपट असो, गडावरील शूटिंग असो, अथवा वाढदिवसाचं कारण असो, हे कलाकार गडावर येऊन सप्तश्रृंगी देवीसमोर नतमस्तक होतात.

शोमधून ब्रेक घेऊन कलाकार मंडळी नव्या भूमिकेत आपल्याला यश मिळावे, आपली भूमिका प्रेक्षकांच्या मनात रुजावी यासाठी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. कधी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यावरही अनेक कलाकार देवी चरणी लिन होतात.

बऱ्याच वेळा चित्रपट सृष्टीत पुन्हा कमबॅक करण्यासाठीदेखील देवीचं दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी कलाकार गडावर येतात. आतापर्यंत मराठी, हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी सप्तश्रृंगगडाला भेट दिली आहे.

देवीचे नवीन रूप बघण्यासाठी सिनेसृष्टीतील ताऱ्यांचे पाय देवीच्या गडाकडे वळू लागल्याचे बघायला मिळत आहेत.

"अलीकडच्या काळात छोट्या पडद्यावरील मालिकांचे शूटिंग सप्तश्रृंगगड परिसरात झाले आहे. देवी दर्शन व पर्यटनासाठी सेलिब्रिटी गडावर येतात. बऱ्याच सेलिब्रिटींकडून नांदुरी पोलीस चौकी परिसरात आम्ही वृक्षारोपण केले आहे." -योगेश गवळी, निसर्ग प्रेमी सौजन्य ग्रुप, नांदुरी

दर्शनाला आलेले सेलिब्रिटी

चिन्मय उदगीरकर, डॉ. अमोल कोल्हे, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, अतुल परचुरे, शिल्पा शेट्टी, प्रार्थना बेहेरे, मिनाक्षी दीक्षित, महेश कोठारे, अलका कुबल, संतोष जुवेकर, शमिता शेट्टी, विशाखा सुभेदार, मृणाल दुसाणीस, पार्श्‍वगायिका अनुराधा पौडवाल, आशा भोसले, स्मिता प्रभू, स्मिता जयकर, रेश्मा शिंदे, श्रीरंग देशमुख, सीमा घोगले, रुपाली भोसले, लेखा मुकुंद, पूजा कदम, सागर कोरडे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे खरंच वीस दिवसांमध्ये NDA मध्ये येतील का? आमदाराचा नेमका दावा काय?

Ind vs Ire T20 WC24 : 5 जूनला भारत-आयर्लंड सामना पावसामुळे रद्द तर… कोणाला होणार फायदा?

Share Market Today: आज शेअर बाजारात काय होणार? इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल?

World Bicycle day 2024: या देशाचे पंतप्रधान मर्सिडीज-BMW तून नाही, तर सायकलने जातात संसदेत, संपूर्ण देश आहे सायकलप्रेमी

Latest Marathi News Live Update: विरार ते दहिसर मार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT