Godavari Mahaarti esakal
नाशिक

SAKAL Special : चालत-बोलता...! गोदावरीला आस आरतीची

वाराणसीतील गंगा आरतीच्या धर्तीवर नाशिक तीर्थक्षेत्रावरही दक्षिण गंगा अर्थात गोदावरीची आरती व्हावी, अशी आशा सर्वांनाच लागून आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाराणसीतील गंगा आरतीच्या धर्तीवर नाशिक तीर्थक्षेत्रावरही दक्षिण गंगा अर्थात गोदावरीची आरती व्हावी, अशी आशा सर्वांनाच लागून आहे. त्यानुसार पावलेही उचलली गेली. गोदावरीच्या प्रस्तावित महाआरतीला फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे.

मात्र ही आरती सुरू होण्यापूर्वीच नेतृत्वावरून वाद उभा ठाकला आहे. वर्षानुवर्षे गोदातीरी पौरोहित्य करणारे पुरोहित संघ आरतीचा मान मिळवू पाहात आहेत, तर रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आरतीचे नियोजन करत आहे.

त्यामुळे आता हा आरतीचा चेंडू कोणाच्या कोर्टात पडणार, याकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागले आहे. अशात कोणी का करेना मात्र गोदावरीची आरती होणार कधी? यांच्या श्रेयवादात आता गोदावरीलाच आरतीची आस लागल्याची चर्चा सामान्य नाशिककर करू लागले आहेत. (sakal special chalta bolta on Godavari aarti political satire tragedy comedy nashik news)

बघा रे तो व्हिडिओ....!

सध्या लाव रे तो व्हिडिओ किंवा बघा रे तो व्हिडिओ असे म्हटले की, चांगल्या-चांगल्या राजकारण्यांना धडकी भरते. राज्य पातळीवर नुकतेच एक व्हिडिओचे प्रकरण गाजले. भाजपच्या एका मोठ्या नेत्याविरोधात तो व्हिडिओ होता.

त्यामुळे व्हिडिओ पुराण चांगलेच चर्चेत आले आहे. यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या बदललेल्या भूमिकांची चिरफाड ‘लाव रे तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून भर सभांमध्ये केली.

त्यामुळे व्हिडिओ म्हटले की काहींना उत्सुकता लागते तर अनेकांना धडकी भरते. नाशिकमध्येही सध्या असाच एक व्हिडिओ अनेकांचे मनोरंजन करत आहे. तर काहींसाठी धडकी भरविणारा आहे.

एका मोठ्या लोकप्रतिनिधी संदर्भातील हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. कोणी म्हणते हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ आलाच कसा, तो जुना आहे. तर काहीजण चौका-चौकात विरोध व समर्थनाचे राजकारण करताना दिसून आले.

काही त्यांच्या पक्षातीलच समर्थकांनी व्हिडिओ चुकीचा असल्याचे सांगत समर्थन केले असले तरी त्या दाव्यात लटकेपणा मात्र जाणवत आहे. विरोधी पक्षातील स्पर्धकांना मात्र व्हिडिओचे आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे आता हे व्हिडिओ प्रकरण कुठल्या स्तरावर जाऊन थांबेल हे येत्या काळातच समजेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT