employyes.jpg 
नाशिक

५०० कर्मचाऱ्यांना शॉक! पहिल्या महिन्यात पगारवाढ..दुसऱ्या महिन्यात व्हीआरएस..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सातपूर : जग कोरोनामुळे संकटात असताना बॉश कंपनी व्यवस्थापनाने कामगार युनियनशी पगारवाढीचा करार करून जगभरात एक चांगला संदेश दिला होता. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असताना हा आनंद मात्र कामगारांच्या चेहऱ्यावर तीस दिवसही टिकला नाही.

पाचशे कर्मचारी धास्तावले 

बॉश कंपनी व्यवस्थापनाने कामगार युनियनशी पगारवाढीचा करार करून जगभरात एक चांगला संदेश दिला होता. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असताना हा आनंद मात्र कामगारांच्या चेहऱ्यावर तीस दिवसही टिकला नाही. दुसऱ्याच महिन्यात व्यवस्थापनाने व्हीआरएस स्किम आणून 400 ते 500 कामगारांना घरी पाठविण्याची योजना आणली. सद्या 60 वर्षांचे निवृत्ती 58 वर्षांवर आणण्याचा निर्णय अनेक कंपन्या घेत आहेत. मात्र, त्या पलीकडे जाऊन 40 ते 45 वयात कामगार आला किवा ज्यांचे पगार कंपनीच्या दृष्टीने गलेलठ्ठ आहेत अशा कर्मचाऱ्यांना सक्तीचा "व्हीआरएस'चा रस्ता दाखविला जात आहे. कोरोनाच्या काळात बॉश कंपनीने पगारवाढीचा करार करत स्वप्न दाखविले. पण, दुसऱ्याच महिन्यात व्हीआरएस लावून सुमारे पाचशे कामगारांना घरी पाठविण्याची योजना आणून त्यांच्या आनंदावर विरजण आणल्याचा प्रकार बॉश कंपनीत घडला. 

निम योजनेचा आधार 
कंपनीमालकांनी जुन्या कामगारांच्या जागेवर नवीन निम योजनेंतर्गत ट्रेनी कामगार भरती करण्याचा सपाटा लावला आहे. या योजनेंतर्गत कामगारांना पाच वर्षांपर्यंत ईएसआय, पीएफसह कोणतेच कामगार कायदे व नियम लागू नाहीत. पण दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर याच कामगारांकडून उत्पादन घेतले जाते, ही योजना किती घातक आहे, हे एचआर व्यवस्थापनातील अनेक अधिकारी आता खासगीत चर्चा करू लागले आहेत. 

कामगार कपातीला सुरवात
1995 ते 2000 च्या दशकात सीएट, महिंद्र, इंडियन टुल आदींसह अनेक मोठ्या कंपनीत व्हीआरएस योजना राबवून कामगार कपातीला सुरवात झाली. याच काळात सर्वांत जास्त व्हीआयपी कंपनीत पाचशेच्या वर व्हीआरएस योजनेत कामगार कपातीचा कटू निर्णय बघावयास मिळाला होता. त्यानंतर आता बॉशमध्ये किमान पाचशेपेक्षा जास्त कामगार कपातीचे उद्दिष्ट असल्याचे मत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे ही काळाची गरज आहे, असेही पदाधिकाऱ्याने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT