Salary reduction of government employees for disaster victims in state nashik news esakal
नाशिक

Nashik News : राज्यातील आपत्तीग्रस्तांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची वेतन कपात

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यात पावसामुळे उद्‌भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भारतीय प्रसासन सेवेतील तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणगी म्हणून कापली जाणार आहे. (Salary reduction of government employees for disaster victims in state nashik news)

राज्य शासनाने आज तसा आदेश काढला आहे. राज्यातील अवकाळी पाऊस गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

त्यात, राज्यातील पुनर्वसनाच्या कार्याला हातभार म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील, भारतीय पोलिस सेवा, राज्य शासनाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्यातील वेतनातून प्रत्येकी एक दिवसाचे वेतन कापून घेतले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्य शासनातील सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या आधिपत्याखालील शासकीय, निमशासकीय, कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांसह सार्वजनिक उपक्रम, महामंडळ, मंडळातील स्वायत्त संस्थेतील विभागप्रमुख कार्यालय प्रमुखांना आज आदेश देण्यात आला आहे.

तसेच कर्मचाऱ्यांच्या अनुमतीपत्रावर स्वाक्षऱ्या घेण्याच्या सूचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. जून महिन्याचे वेतन देण्यापूर्वी एक दिवसाचे कपातीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी हिशेब सादर करण्यासाठी पद्धत ठरवून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT