Sudhakar Badgujar coming out at night after police interrogation  esakal
नाशिक

Salim Kutta Dance Case: आयुक्तांच्या चौकशीला बडगुजरांची ‘त-त-फ-फ’! प्रश्नांच्या भडिमाराने बडगुजर तणावात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई बॉम्बस्फोटातील शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेतचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर पोलीस आयुक्तांकडून करण्यात आलेल्या प्रश्नांच्या भडीमाराने तणावात आले.

आत्तापर्यंत विचारण्यात आलेल्या सुमारे ७५ प्रश्नांपेक्षाही अधिक प्रश्नांची उत्तरे बडगुजर देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पोलीस आता डान्सपार्टींतील साक्षीदारांच्या कसून चौकशी करीत तांत्रिक तपासावर भर देत बडगुजरांभोवती चौकशीचा फास आवळत आहेत. (Salim Kutta Dance Case Badgujar fumble to police commissioner inquiry Badgujar tensed with barrage of questions nashik Crime)

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व कुख्यात अंडरवल्र्डडॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेला महंमद सलिम मीर शेख उर्फ सलिम कुत्ता याच्यासमवेत २०१६ मध्ये उबाठाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या आडगाव परिसरातील फार्महाऊसवर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

यासंदर्भात मंगळवारी (ता.१९) बडगुजर यांची सायंकाळी पुन्हा दीडतास चौकशी करण्यात आली. यावेळी बडगुजर यांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या चौकशीला सामोरे जावे लागले.

मात्र, गेल्या चार वेळा करण्यात आलेल्या चौकशींमध्ये बडगुजर यांना विचारण्यात आलेल्या सुमारे ७५ पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आता आपला मोर्चा त्या पार्टीत सहभागी असलेल्या साक्षीदारांकडे वळविला असून, त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

तसेच, तांत्रिक तपासाच्या आधारेही तपास सुरू केला आहे. यामुळे बडगुजर ज्या प्रश्नांची उत्तरे टाळत आहेत, त्याची उत्तरे पोलीस मिळविण्यासाठी पोलीस अन्य मार्गांचा हातखंडा वापरत आहेत. यामुळे बडगुजरांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

बडगुजरांची आजही चौकशी पण,...

सलिम कुत्तासोबतची पार्टी कुठे, आणि कोणी आयोजित केली. कुत्ताला पार्टीत कोणी बोलाविले, या पार्टीमागचा नेमका उद्देश काय या सह अनेक संवेदनशिल प्रश्नांची सरबत्ती पोलीस आयुक्त कर्णिक यांनी बडगुजरांवर केली.

मात्र बडगुजर यांनी उत्तरे टाळल्याने त्यांना बुधवारी (ता.२०) पुन्हा चौकशीला बोलाविले आहे. परंतु यावेळी बडगुजर यांनी चौकशीवेळी वकीलांसमवेत उपस्थित राहण्याची परवानगी मागितली असता, आयुक्तांनी त्यास मान्यता दिली आहे.

कुत्ताच्या चौकशीपूर्वी

डान्सप्रकरणात सलिम कुत्ता याचीही चौकशी केली जाणार आहे. परंतु त्यापूर्वी २०१२ ते २०१६ यादरम्यान नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सलिम कुत्ता असताना याकालावधीत त्याला कितीवेळा पॅरोल देण्यात आली, कोण त्याला भेटत होते, बडगुजर न्यायालयीन कोठडीत असताना त्यांची भेट कशी झाली याची माहिती पोलीसांनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाकडून मागविली आहे.

त्यानंतर सलिम कुत्ताच्या चौकशीसाठी न्यायालयाची परवानगी पोलिसांना घ्यावी लागेल, त्यानंतर त्यांची चौकशी होऊन त्यातून बडगुजर भेटीची व डान्सपार्टीची उकल होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

French PM Resigns: फ्रान्सची राजकीय अस्थिरता शिगेला! मंत्रिमंडळ नेमलं, पण पंतप्रधानांचा काही तासांत राजीनामा

Vijay Wadettiwar: ''काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर...'', जरांगेंना उत्तर देताना वडेट्टीवारांचं मोठं विधान

Pune Traffic Police : मोशीत वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे दोघे अटकेत; सिग्नल तोडल्याचे छायाचित्र काढल्याने वाद

Shocking News: हृदयद्रावक घटना ! पुराने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला; शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी जीवन संपवले

SCROLL FOR NEXT