नाशिक

Eknath Shinde: महापालिकेच्या निवडणूका घ्या, मग राजस्थानात प्रचाराला जा, ठाकरे गटाच्या नेत्याचे CM शिंदे यांना आव्हान

सकाळ वृत्तसेवा

Sanjay Raut: विधानसभा अध्यक्षांना दिल्लीतून आदेश येतात. घटनेनुसारनुसार निर्णय दिला असता तर हे सगळे आमदार घरी बसले असते. परंतु, दिल्लीचे आदेश काय असतात यावर सध्या सुनावणी सुरू आहे.

विधानसभा अध्यक्षांचा आम्ही नेहमी आदर केला आहे. परंतु, ही व्यक्ती लायक नसल्याचे सांगत, पक्ष सोडून गेलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे असा कायदा सांगत असल्याचे असे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी म्हटले. (sanjay raut statement Order to Assembly Speaker from Delhi news)

नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाच्या आमदार, खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार व छगन भुजबळ, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यावर टीका केली.

श्री. राऊत म्हणाले, की आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडतो. या राज्यात लूट सुरू असल्याने आवाज उठवत आहोत. याला गिरीश महाजन वेडेपणा म्हणत असेल तर आम्ही वेडे आहोत असे त्यांनी सांगितले.

तुमचं ना महाराष्ट्राशी संबंध ना छत्रपतींशी, तुमचा संबंध खोक्याशी आणि तुमच्या पक्षाचे अध्यक्ष मकाऊ वरून कर्तबगारी करून आलेत का असा सवालही त्यांनी केला. राज्यातील महापालिकेच्या निवडणूका घ्या, मग राजस्थानात प्रचाराला जा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून बोलताना राऊत यांनी मकाऊत पैसे उधळायला चंद्रशेखर बावनकुळे गेले असेल तर त्यांनी कबूल करा असा सल्लाही श्री. बावनकुळेंना दिला.

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी कोरोना काळात कंत्राटदार रोमीन छेडासोबत श्री. ठाकरे यांचे संबंध असल्याचा आरोप केला. त्याला उत्तर देताना खासदार राऊत यांनी श्री. सौमय्या मुलुंडचा नागडा पोपटलाल असल्याची टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT