Dignitaries inaugurating the 61st Maharashtra State Sanskrit Drama Competition.
Dignitaries inaugurating the 61st Maharashtra State Sanskrit Drama Competition. esakal
नाशिक

Sanksrit Rajya Natya Spardha : संस्कृत राज्यनाट्याची तिसरी घंटा वाजली!

प्रतीक जोशी

नाशिक : ६१ व्या महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्यस्पर्धेची तिसरी घंटा सोमवारी (ता. ३०) वाजली. संस्कृत सभा नाशिकचे कार्यकारिणी सदस्य अमित नागरे यांच्या हस्ते प. सा. नाट्यगृह येथे स्पर्धेचे उद्‌घाटन झाले.

नाट्यपरिषदेचे कार्यवाह सुनील ढगे अध्यक्षस्थानी होते. या वेळी कार्यदर्शिनी तजश्री वेदविख्यात, समन्वयक राजेश जाधव, सहसमन्वयक मीना वाघ उपस्थित होते. यंदा स्पर्धेत एकूण १५ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. (Sanksrit Rajya Natya Spardha started nashik news)

संदीप ढिकले, शिवानी कोटीभास्कर, प्रणव चवचाळकर हे या स्पर्धेचे परिक्षण करणार आहेत. सनेत्रा मांडवगणे यांनी यावेळी सूत्रसंचालन केले. दरम्यान, स्पर्धेत सोमवारी तीन नाटकांचे सादरीकरण झाले. सुरवातीला, वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालयातर्फे ‘ओरीगामी’ या नाटकाचे एकांकिकेचे सादरीकरण झाले.

अश्‍विन हातवळणे लिखित या नाटकाचा संस्कृत अनुवाद तन्मय भोळे, रुचिता पंचभाई यांनी केला. नाटकाचे दिग्दर्शन देखील तन्मय भोळे यांनी केले. धनश्री पाटे, सागर संत या कलावंतांनी या एकांकिकेत भूमिका साकारल्या. जय खोरे यांनी संगीत संयोजन केले.

मुग्धा जेऊरकर यांनी नेपथ्य तर चैतन्य गायधनी यांनी प्रकाशयोजना साकारली. नेहा कोठावदे यांनी वेशभूषा तर स्वरांजली गुंजाळ यांनी रंगभूषा साकारली. परिसा हजारे, नेहा जैन, दिव्या बागूल, स्वरांजली रानडे, रसिका मुळे, मैथिली नगरकर यांनी नेपथ्य साहाय्य केले.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

यानंतर संस्कृत भाषा प्रसारिणी सभा, नागपूरतर्फे ‘घटमिता बुद्धिः’ ही एकांकिका सादर झाली. डॉ. रेणुका करंदीकर लिखित या एकांकिकेचे दिग्दर्शन रवींद्र संगवई यांनी केले. अवधूत पाठक, सोहम बावडेकर, राम काळकोंडे, श्रेया करंदीकर, अर्णव हिंगणकर, कैवल्य देशमुख, साईश्री हेडा, देवव्रत देशपांडे, संवेदना भातकुलकर, शैवी पाठक,

नूपुर देशपांडे या कलावंतांनी भूमिका साकारल्या. सुप्रिया काळकोंडे, शारदा देशमुख, प्रीती हिंगणकर, अनिल कदमकर यांनी वेशभूषा तर तृप्ती पाठक, ममता भातकुलकर, सोनाली बावडेकर यांनी रंगभूषा साकारली. रिशिल ढोबळे, भारती हेडा यांनी प्रकाशयोजना तर आशिष दुर्गे यांनी संगीत दिले.

यानंतर नाशिक जिल्हा लेखा व कोशागार कर्मचारी पतसंस्थेतर्फे ‘तथास्तु’ ही एकांकिका सादर झाली. श्रीराम वाघमारे लिखित या एकांकिकेचा अनुवाद निखिल जगताप यांनी केला. जयदीप पवार यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले.

जयप्रकाश शुक्ल, अनुजा ओढेकर, सृष्टी शिरवाडकर, वैष्णवी ताम्हणकर, समीर खरे, ऋग्वेद देशपांडे या कलावंतांनी भूमिका साकारल्या. तन्मय लोहगावकर, वंदन वेलदे यांनी नेपथ्य तर जयदीप पवार यांनी प्रकाशयोजना साकारली. सिद्धी बोरसे यांनी पार्श्‍वसंगीत दिले. पात्रांच्या रंगभूषा माणिक कानडे तर वेशभूषा नेहा उपाध्याय यांनी साकारल्या.

हृषीकेश पाटील, हृषीकेश शिरसाठ, यश आरोटे यांनी रंगमंच साहाय्य केले. जगदीश घोडके यांनी निर्मिती सूत्रधार म्हणून काम पाहिले. दरम्यान, स्पर्धेत मंगळवारी (ता. ३१) ‘आस्फोटनं भोकरवाडेः’, ‘सत्यं शोधं सुन्दरम्’ या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT