Actors presenting scenes from the play 'Asphotnam Bhokarwade:' in the Sanskrit State Drama Competition. esakal
नाशिक

Sanskrit Rajya Natya Spardha : नाट्यरसिकांना संस्कृत नाटकांची मेजवानी; स्पर्धेत 2 एकांकिका सादर

प्रतीक जोशी

नाशिक : ६१ वी महाराष्ट्र हौशी संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेला जोरदार सुरवात झाली आहे. मंगळवारी (ता. ३१) स्पर्धेत दोन एकांकिका सादर झाल्या. सुरवातीला नाट्यसेवा थिएटर्स नाशिकतर्फे ‘आस्फोटनं भोकरवाडेः’ ही एकांकिका सादर झाली.

अजय पाटील लिखित या एकांकिकेचा अनुवाद श्रद्धा शाह यांनी केला. रोहित जाधव यांनी दिग्दर्शन केले. मयूर परणकर, निकिता लोंढे, रोहित शिंदे, आकर्ष ललवाणी, ज्ञानेश्‍वर वारडे, हर्षद झोमण, योगेश भोये, सुशील सुर्वे, अभिजित गायकवाड, आशू चव्हाण, अनन्या शिंदे, सपना चौधरी या कलावंतांनी भूमिका साकारल्या.

वेशभूषा व नेपथ्य हर्षद झोमण, स्वप्नील पाटील यांनी तर स्वप्नील नरवाडे यांनी प्रकाशयोजना साकारली. आदित्य पोवार यांनी रंगभूषा साकारली. (Sanskrit Rajya Natya Spardha feast of Sanskrit plays for theater lovers 2 one act performance in competition nashik news)

यानंतर सीमेन्स सांस्कृतिक संस्था, ठाणेतर्फे ‘सत्यं शोधं सुन्दरम्’ ही एकांकिका सादर झाली. हेमंत एदलाबादकर लिखित एकांकिकेचे ईशा कुलकर्णी यांनी भाषांतर केले.

सतीश देसाई यांनी दिग्दर्शन केले. साकार देसाई, प्रद्युन्म लिमये, मंदार खटावकर, मैत्रेयी खटावकर, दीपक चिपळूणकर, प्रवीण गोडसे, हेमांगी जोशी, नेहा भागवत, अथर्व भागवत, ईशा कुलकर्णी, सतीश देसाई, पुष्कर जोशी, सुजित कवे, संजय वाणी, विकास आमोदकर, चेतन दुर्वे, श्‍वेता ठाकूर, आदिती भागवत या कलावंतांनी भूमिका साकारल्या.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

नेपथ्य डॉ. गणेश तरतरे यांनी केले तर गायत्री खांडगे, सोहम शिंपी यांनी साहाय्य केले. सुराज सोमण, ईशा कुलकर्णी यांनी संगीत संयोजन अन् पार्श्‍वगायन केले. सोनाली गोखले यांनी नृत्य साकारले. पौर्णिमा चिपळूणकर यांनी रंगभूषा तर वेशभूषा सुनीता देसाई यांनी साकारली. महादेव गेजगे, रूपा खटावकर यांनी रंगमंच व्यवस्था केली.

आजचे नाटक

स्पर्धेत बुधवारी (ता. १) ‘सुलोचना’, ‘कथा अन्वेषणस्य’, ‘तमोनैबद्ध्यम’, ‘वंचितो परिवंचितो’, ‘प्राणवल्लभा’, ‘आलम्बः’ या एकांकिका सादर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT