saputara.png 
नाशिक

महामार्ग नव्हे मृत्यूचा सापळाच! खड्ड्यांनी घेतला 5 ते 7 जणांचा बळी; नागरिकांत संताप

रतन चौधरी

नाशिक : (सुरगाणा) वणी ते सापुतारा राज्य महामार्गावरील घागबारी नजीकच्या भितबारी रस्त्यावरील भलामोठा खड्डा मृत्यूचा सापळा बनला असून, तो जीवघेणा ठरत आहे. भितबारी हा भाग सुरगाणा, दिंडोरी व कळवण या तीन तालुक्यांच्या पोलिस हद्दीवर येत असल्याने तक्रार नेमकी करायची कोणाकडे, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांना पडला आहे. 

खड्ड्यांवरून बांधकाम विभागात सीमावाद 

आजपर्यंत पाच ते सात दुचाकीस्वारांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तसेच वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला खोल गटारीत पडून हातपाय मोडले आहेत, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. आठवडाभरापूर्वी निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील दुचाकीस्वाराचा याच खड्ड्यात वाहन आदळल्याने रस्त्यावर डोकं आपटून जागीच मृत्यू झाल्याचे घागबारीचे पोलिस गोपाळ गायकवाड यांनी सांगितले. या जागेवर थोडा उतार असल्याने उंबरपाडाकडील टोलनाका पार करून वाहने वेगात येतात. त्यामुळे खड्डा दूरवरून चालकाच्या लक्षात येत नाही. वाहन अगदी जवळ आल्यावर खड्डा समजतो. त्यामुळे चालकांची धांदल उडून वाहनावरील नियंत्रण सुटते व अपघात होतो. 

अभियंते उंटावरून शेळ्या हाकताय का? असा संतप्त सवाल

घागबारी येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास पिठे, लक्ष्मण गायकवाड, गुलाब गांगुर्डे, लक्ष्मण गायकवाड, चिंतामण गायकवाड आदींनी गांधगिरी करत खड्ड्याचे मोजमाप घेतले असून, साधारणतः एक मीटर चौरस व अर्धा फूट खोली आहे. याचे माप महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा खड्डा कित्येकदा मातीने बुजविला. मात्र आठवडाभरातच माती निघून तो मोकळा होतो. या रस्त्यावर हतगड ते घागबारी यादरम्यान खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून, संबंधित अभियंते विमानाने प्रवास करतात की उंटावरून शेळ्या हाकतात? असा संतप्त सवाल वाहनचालक व नागरिक उपस्थित करीत आहेत. 

झोपेचे खोबरे 

सुरगाणा तालुक्याच्या सीमेवर हा खड्डा असल्याने या रस्त्यावर रात्री-अपरात्री अपघात होऊन वाहनांचे किंवा एखादा चालक, प्रवासी जखमी झाल्यास मदतीसाठी जावेच लागते. वणी पोलिसांना खबर द्यावी लागते. त्यामुळे दोन्ही तालुक्यांचे काम करावे लागते. कित्येकदा जखमींना वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागते. त्यामुळे आठवडाभरात एक-दोन वेळा तरी झोपेचे खोबरे होते, अशी व्यथा पोलिसपाटील गोपाळ गायकवाड यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Gangapur VIP Facility: गंगापूरमध्ये ३.७० कोटींच्या व्हीआयपी विश्रामगृहाचे लोकार्पण; शासकीय निवासस्थानांमुळे अधिकारी मुख्यालयी राहणार

SCROLL FOR NEXT