nashik crime news esakal
नाशिक

Nashik : सोनसाखळी चोरट्यासह सराफास अटक; 3 गुन्हे उघड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत ओरबाडणाऱ्या सोनसाखळी चोरट्यास जेरबंद करण्यात सातपूर पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकास यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकीसह २ लाख १७ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला. यासह चोरीचे सोने खरेदी केलेल्या सराफालाही पोलिसांनी अटक केली. या वेळी आणखी तीन गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. (saraf arrested along with gold chain thief 3 crimes exposed Nashik Latest Marathi News Nashik)

३० ऑगस्टला दुपारी सातपूर येथील प्राची बाबर या मुलाला शाळेत सोडण्याकरिता राधाकृष्णनगर परिसरातील जयकृष्ण चौकातून पायी जात होत्या. समोरून दुचाकीवर आलेल्या संशयिताने श्रीमती. बाबर यांच्या गळ्यातून सोन्याची पोत ओरबाडून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सातपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तीन पथके तयार करत आणि सीसीटीव्ही फूटेज तपासले. संशयिताच्या पेहरावावरून श्रमिकनगर, कार्बन नाका आणि राधाकृष्णनगर येथे शोध घेण्यास सुरवात केली असता, पोलिस नाईक श्री. आव्हाड आणि श्री. गुंजाळ एकावर संशय आला. त्यांनी त्याचा पाठलाग करत श्रमिकनगर भागातून अटक केले.

चंद्रकांत केदारे (रा. श्रमिकनगर), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सातपूरमधून तीन गुन्हे केल्याचे कबूल केले व सदर सोने हे कृष्णा टाक (३३, रा. श्रमिकनगर) यास विकल्याचे सांगितले. सदर सोने हे चोरीचे असल्याचे माहिती असूनही सोनार टाक याने वेळोवेळी त्याच्याकडून सोने खरेदी केल्याने पोलिसांनी त्यालादेखील अटक केली. सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण, श्री. घोटेकर, सहाय्यक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक श्री.जाधव, श्री. भामरे, श्री. कासार, श्री. सानप, श्री. नांद्रे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT