transfers news esakal
नाशिक

Nashik News : सातपूरच्या वरिष्ठासह सहाय्यक निरीक्षकांची उचलबांगडी

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (जि. नाशिक) : सातपूर पोलिस ठाण्याचा कारभाराची गंभीर दखल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण व क्राईम सहाय्यक निरीक्षक सतीश घोटेकर यांची तडकाफडकी उचलबांगडी करत राजू पठाण यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे काही दिवसांपासून सातपूर पोलिस स्टेशन विविध घटनांनी चर्चेला येत होते. (Satpurs senior along with assistant inspectors transfer Nashik News)

अवैद्य सावकारांबाबत पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेबाबत ‘सकाळ’ मधील वृत्ताची पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांची विशेष शाखेत, तर क्राईम पीआय सतीश घोटेकर यांना उपनगर पोलिस ठाण्यात तडकाफडकी बदली केली.

वर्षभरात सातपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. यातच विविध गुन्हेगार पाश्वभुमी असलेल्यांबरोबर अनेक कार्यक्रमात फोटोसेशन करत सोशल मीडियावर टाकले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवत नव्हते. औद्योगिक वसाहतीमध्ये वाढती गुन्हेगारीला पोलिस आळा घालू शकले नाही. टपऱ्यांच्या शेडमध्ये सर्रास अवैद्य दारू विक्री असून,

भगवान गड बंगल्यासह सुमारे अर्धा डझन दरोडे व घरफोडीचे घटनांचा आजपर्यंत तपास लागू शकलेला नाही. विविध घटनेमुळे आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

SCROLL FOR NEXT