Savitribai Phule Mahila Patsanstha makes a profit of Rs 8 lakh in Financial year Nashik News esakal
नाशिक

सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेस 8 लाखांचा नफा

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : वावी येथील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेस मार्च २०२२ अखेर आठ लाख ५६ हजारांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक मालती गवळी यांनी दिली.

पतसंस्थेच्या ठेवीमध्ये गेल्या वर्षापेक्षा एक कोटीने वाढ झाली असून, भागभांडवल ४० लाख असून, आर्थिक वर्षात पाच लाखांची वाढ झाली आहे. संस्थेची चालू आर्थिक वर्षात (Financial year) गुंतवणूक एक कोटी ७३ लाख असून, कर्ज वाटप तीन कोटी १७ लाखांचे आहे. संस्थेची कर्जवसुली ९७ टक्के झाली असून, थकबाकी तीन टक्के आहे. संस्थेचा सीडी रेशो ६९.४५ टक्के असून एनपीएचे (NPA) प्रमाण पाच टक्के आहे. संस्थेचे खेळते भागभांडवल पाच कोटी पाच लाख ३४ हजार आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळातही (Corona) चांगल्या प्रकारे कर्जवसुलीसाठी प्रयत्न केले.

सभासद व ग्राहकांसाठी आरटीजीएस (RTGS), एनएफटी (NFT) व वीजबिल भरणा सुविधा पुरवल्या जातात. संस्थेने दहा वर्षापासून कर्जदार सभासदांना विमा संरक्षण ठेवले आहे. तसेच सोने तारण ग्राहकांनाही विमा संरक्षण ठेवले आहे. संस्थेने आत्ताच २१ वा वर्धापन दिन साजरा केला. संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने आहे. संस्थेच्या अध्यक्षा सरस्वती गोराणे, उपअध्यक्ष अर्चना घेगडमल, संचालक शशिकला अत्रे, ऊर्मिला घोटेकर, निर्मला काकड, मंगल वेलजाळी, शोभा आनप, संजीवनी भसे, संगीता गोराठी व ताराबाई कहांडळ, व्यवस्थापक यशवंत गवळी, भगवान भोपी, योगेश गवळी संस्थेच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT