Guidance On JEE and NEET Exams By Durgesh Mangeshkar Esakal
नाशिक

JEE NEET Exam: अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्यांना जेईई, नीटसाठी मिळणार अर्थसहाय्य; सोमवारपर्यंत मुदत

जेईई, नीटसाठी अर्थसहाय्य : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बार्टीची योजना

सकाळ वृत्तसेवा

JEE NEET Exam : अनुसूचित जाती संवर्गातील इयत्ता अकरावीत शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्यांना जेईई, नीट या प्रवेश परीक्षांच्‍या तयारीसाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य मिळेल.

यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्‍था (बार्टी) यांच्‍यातर्फे योजना राबविली जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्‍छुक पात्रताधारक विद्यार्थ्यांना सोमवार (ता. २७)पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल. (Sc students will get financial assistance for JEE NEET nashik news)

अभियांत्रिकी शिक्षणासाठी जेईई मेन्‍स, तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षेच्‍या आधारे प्रवेश दिला जातो. या परीक्षांमध्ये अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी ‘बार्टी’तर्फे योजना उपलब्‍ध आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, शैक्षणिक साहित्‍यासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे.

मुंबईबरोबर छत्रपती संभाजीनगर, पुणे व नाशिक या ठिकाणी हे प्रशिक्षण उपलब्‍ध आहे. ‘बार्टी’च्‍या योजनेंतर्गत ‘जेईई’साठी १०० आणि ‘नीट’साठी १०० असे एकूण २०० पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्‍यासाठी दहावीतील गुणांच्‍या आधारे प्राधान्‍य निश्‍चित केले जाणार आहे. निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्‍ध असेल. ७५ टक्क्‍यांपेक्षा अधिक उपस्‍थिती असलेल्‍या विद्यार्थ्यांनाच मासिक विद्यावेतन अदा केले जाणार आहे.

दरम्‍यान, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.

त्‍याच्‍याकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला, अधिवास दाखला असावा. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशित असावा. तसेच, त्‍याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्‍पन्न आठ लाखांपर्यंत असावे.

उपलब्‍ध असलेल्‍या २०० जागांमध्ये काही जागा आरक्षणाने राखीव राहणार आहेत. यात ३० टक्‍के जागा विद्यार्थिनींसाठी आरक्षित राहतील. चार टक्‍के दिव्‍यांग विद्यार्थी, पाच टक्‍के अनुसूचित जातीअंतर्गत वंचित जातीतील विद्यार्थी, एक टक्का जागांचे आरक्षण अनाथ उमेदवारांसाठी असणार आहे. विशेष बाब म्‍हणून पाच टक्‍के जागा आरक्षित ठेवल्‍या जातील.

निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना असे मिळणार लाभ

या योजनेंतर्गत निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार आहे. यासोबत प्रशिक्षण कालावधीत दर महिन्‍याला सहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. अभ्यास साहित्‍य खरेदीसाठी एकदाच एकरकमी पाच हजार रुपयांची सहाय्यता केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT