Online Admission Sakal Media
नाशिक

Nashik News: अर्ज दाखल होत नसल्‍याने विद्यार्थी हवालदिल; महाडीबीटी पोर्टलचा फज्‍जा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: शासनाच्‍या विविध शिष्यवृत्ती योजनांकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. परंतु महाडीबीटी पोर्टलवर अर्जच दाखल होत नसल्‍याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

तांत्रिक कारणांनी अडचणी उद्‌भवत असताना पोर्टलचा फज्‍जा उडाला असल्‍याचे चित्र आहे. दरम्‍यान या गैरसोयीमुळे काही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहाण्याची भीती व्‍यक्‍त केली जाते आहे. (scholarship applications were not being submitted on MahaDBT portal nashik news)

शासकीय योजनांमध्ये पारदर्शकता आणताना ऑनलाइन माध्यमातून अर्ज प्रक्रिया राबविण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे. त्‍यानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ पोचविण्याकरिता महाडीबीटी पोर्टलच्‍या माध्यमातून प्रक्रिया राबविली जाते. सध्या या पोर्टलद्वारे शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

परंतु अडथळ्यांची शर्यत पार करत अर्ज दाखल करावे लागत असल्‍याने विद्यार्थ्यांची दमछाक होते आहे. बहुतांश विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेचा आधार घेत असतात. अशात एका वेळेत अर्ज भरून होत नसल्‍याने वारंवार कॅफेच्‍या चकरा मारताना चपला झिजविण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढवते आहे. तसेच वारंवार प्रयत्‍नात फॉर्म भरताना पैसे मोजावे लागत असल्‍याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे.

या अडचणींचा करावा लागतोय सामना

सायबर कॅफेच्‍या चालकांनी दिलेल्‍या माहितीनुसार गेल्‍या सुमारे पंधरा ते वीस दिवसांपासून पोर्टलवर विविध प्रकारच्‍या तांत्रिक अडचणी उद्‌भवत होत्‍या. शुक्रवारी (ता. १) पर्यंत संकेतस्‍थळावर विद्यार्थ्यांची प्राथमिक माहितीवर आधारित प्रोफाइल अपडेट होताना तांत्रिक अडचणी येत होत्‍या.

तर शनिवार (ता. २) पासून कागदपत्रे अपलोड होण्यापर्यंत प्रक्रिया होऊन अंतिम टप्यांत संकेतस्‍थळ ठप्प पडत असल्‍याची अडचण उद्‌भवत होती. शहरात सुमारे पन्नास ते साठ सायबर चालकांकडून अर्ज प्रक्रियेची सुविधा उपलब्‍ध केली आहे. या प्रत्‍येक सायबर कॅफेमध्ये रोजचे सरासरी दहा ते पंधरा विद्यार्थी अर्ज भरले जात नसल्‍याने रिकाम्‍या हाती परत जाता आहेत.

शासकीय यंत्रणा, विद्यार्थी संघटनांचे दुर्लक्ष

अर्ज दाखल करण्यात अद्याप मुदत असली तरी वारंवार तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी मेटाकुटीला आलेले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासकीय यंत्रणेतही उदासीन धोरण बघायला मिळत आहे. दुसरीकडे विविध राजकीय पक्षांच्‍या विद्यार्थी संघटनांचेही या समस्‍येकडे दुर्लक्ष झालेले असल्‍याने विद्यार्थ्यांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्‍न उपस्‍थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News: सिंहस्थाच्या पर्वावर उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनाला ‘बूस्ट’! नाशिक-शिर्डी-त्र्यंबक ‘धार्मिक कॉरिडॉर’ने जोडले जाणार, पर्यटनवाढीची संधी..

'ये बात रोशन!' घराबाहेर काढण्याच्या टास्कमध्ये रोशन तन्वी भिडणार, धोका दिल्याने रोशन सगळ्यांसमोर तन्वीला सुनावणार, नेटकरी खुश

Republic Day Marathi Wishes 2026: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा देशभक्तीपर हटके शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक संदेश

Elon Musk Fraud : लग्नाचं आमिष, महागडे गिफ्ट्स...'इलॉन मस्क' ने मुंबईच्या महिलेला फसवलं? 16 लाख रुपये लुटले, पाहा जगभर गाजलेलं प्रकरण काय

Latest Marathi news Live Update: "२७ जानेवारी हा आपल्या राज्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस ..." मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

SCROLL FOR NEXT