minority education.jpg 
नाशिक

खुशखबर! २२ हजार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती...शासनाचा हिरवा कंदील

राजेंद्र दिघे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील २२ हजार २४२ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित होती. या शिष्यवृत्तीस शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. दहा कोटी ४१ लाख २८ हजार २८७ रुपयांची शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त होणार आहे. 

२२ हजार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 
राज्यातील उच्च व्यावसायिक शिक्षण, तंत्रशिक्षण अभ्यासक्रम बारावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दर वर्षी प्रत्येकी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. तीन लाखांपर्यंत उत्पन्नाची अट, मागील वर्षात ५० टक्के गुण असावेत, अल्पसंख्याक प्रमाणपत्र आवश्यक असते. या योजनेत दहा हजार, १५ हजार, तर सध्या २५ हजार शिष्यवृत्ती दिली जाते. 

गतवर्षी २१ हजार विद्यार्थ्यांना लाभ 
गतवर्षातील २१ हजार ८३९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. २१ हजार ६१२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे, तर आठ हजार ७७४ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यासह दहा कोटी २१ लाख ५० हजार ३३१ रुपये थकीत होते. शिक्षण संचालक कार्यालयाने ६३० लाभार्थ्यांची १९ लाख ७७ हजार ९७४ रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. 

नवाब मलिक यांच्या संघटनेच्या चर्चेची व पाठपुराव्याची दखल
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेली शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने अखिल भारतीय ऊर्दू शिक्षक संघाने शासनास वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, मार्चमध्ये अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या संघटनेच्या चर्चेची व पाठपुराव्याची दखल घेतली. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसह इतर शिष्यवृत्ती योजनांच्या अडीअडचणी दूर करत निधी वितरण करण्यासंदर्भात चर्चेनुसार अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी १४ जुलैला आदेश निर्गमित केल्याची माहिती राज्य सरचिटणीस साजीद निसार अहमद यांनी दिली. दरम्यान, आहरण व संवितरण अधिकारी शिष्यवृत्तीची रक्कम तत्काळ वाटप करावी. 

दृष्टिक्षेपात राज्याची आकडेवारी 
-अल्पसंख्याक लाभार्थी : २२ हजार २४२ 
-मंजूर शिष्यवृत्ती विद्यार्थी : २१,८३९ 
-मंजूर निधी : १० कोटी ४१ लाख २८ हजार २८७ रुपये 
-दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी : ८ हजार ७७४ 
-प्रतिविद्यार्थी : २५ हजार रुपये 

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास उपयुक्त ठरते. वेळेवर प्राप्त होत नाही, दोन वर्षे वाट पाहावी लागते. शैक्षणिक खर्च पाहता ही रक्कम अल्प असून वाढ व्हावी. दर वर्षी वेळेत देण्यात यावी. -फायजा सदफ, एस.वाय. बीएस्सी 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

लोककल्याणाची गाथा आणि भक्तीचा वसा ! अभंग तुकाराम सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, या तारखेला रिलीज होणार सिनेमा

Rohit Arya Encounter: 'बाथरुम'मधून पोलिस आत शिरले अन्.., कसा घडला किडनॅपरच्या एन्काऊंटरचा थरार?

IND A vs SA A 1st Test: विराटची कसोटीतील जागा रिषभ पंतला मिळाली? फोटोमुळे चर्चा; मुंबईच्या गोलंदाजाने गाजवला पहिला दिवस

Latest Marathi News Live Update : मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली - वर्षा गायकवाड

SCROLL FOR NEXT