malegaon achool 123.jpg 
नाशिक

‘शाळेची बेल वाजली खरी, मात्र विद्यार्थी अजूनही घरी’ मालेगावात बहुतांश शाळांमध्ये परिस्थिती

प्रमोद सावंत

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : शासनाच्या निर्देशानुसार सोमवार (ता. ४)पासून नववी ते बारावीची शाळा सुरू झाली. ‘शाळेची बेल वाजली खरी, मात्र विद्यार्थी अजूनही घरी’ अशीच परिस्थिती मालेगाव शहरातील बहुतांश शाळांमध्ये पहिल्या दिवशी दिसली. 

मालेगावात शाळेची बेल वाजली, मात्र विद्यार्थी घरीच 
सर्व शाळांमध्ये परिसर वर्ग सॅनिटाइझ केले. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना थर्मल स्क्रीनिंग, शारीरिक अंतर ठेवण्यात आले. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दुबार पद्धती, सम-विषम, एक दिवसाआड टप्प्याटप्प्याने विद्यार्थी बोलावूनदेखील उपस्थितीचे प्रमाण अत्यल्प होते. विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला. एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठकव्यवस्था ठेवून ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने शिक्षण सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांनी शाळा उघडल्याचा आनंद व्यक्त केला. महापालिकेचे प्रशासन अधिकारी फर्नांडिस चव्हाण यांनी काही शाळांना भेटी दिल्या. नियोजनानुसार बोलविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण माध्यमिकचे ४० ते ५० टक्के, कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेचे प्रमाण ७० टक्के, वाणिज्य ५० टक्के, कला शाखेचे अवघे ३० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. 

शिक्षकांची कोविड चाचणी नाही 
शिक्षकांची कोविडची चाचणी करणे अपेक्षित असताना शहरातील शिक्षकांची चाचणी झालेली नाही. महापालिका प्रशासनाने निधीचे कारण देत चाचणी घेणे सोयीस्कर टाळले असून, या संदर्भात शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह पालकांनी नाराजी व्यक्त केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Team India : शुभमन गिल-गौतम गंभीरच्या मार्गात 'लक्ष्मण'रेषा! Asian Games च्या संघातील खेळाडू देण्यास नकार; विंडीज मालिकेत संघ संकटात...

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Latest Marathi News Update : गडचिरोलीत ST बस उलटली; 25 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT