School Bus esakal
नाशिक

शाळा सुरु बस बंद! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल

संदिप मोगल

तब्बल दोन वर्षानंतर शिक्षकांना गुरुजी, सर हे शब्द ऐकण्यास मिळाले. त्यामुळे अनेक शिक्षक भारावून गेल्याचे दिसून आले. मात्र ग्रामीण भागात बस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात विरजण पडले आहे.

लखमापुर (जि. नाशिक) : शासनाने ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर ग्रामीण भागातील पालकांसह विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

शाळा सुरु झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. विशेष म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर शिक्षकांना गुरुजी, सर हे शब्द ऐकण्यास मिळाले. त्यामुळे अनेक शिक्षक भारावून गेल्याचे दिसून आले. मात्र ग्रामीण भागात बस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात विरजण पडले आहे.

कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढल्यापासून ग्रामीण भागातील खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्याचप्रमाणे बसदेखील बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी दिंडोरी येथे तालुक्याच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालयात जातात. शाळा सुरु होऊन पाच ते सहा दिवस झाले आहे तरी ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बसचे दर्शन झालेले नाही.

शाळेत जायला बस तर घरी जायला नाही

काही ठिकाणी आदिवासी विकासच्या बस चालू झाल्या आहेत. बस एकाच वेळेस येत असल्याने विद्यार्थ्यांना बस शाळेपर्यंत घेवून तर जाते पण शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था नाही. काही विद्यार्थ्यांना जाताना बस आहे तर येण्यासाठी नाही. तरच पास पण उपलब्ध नसल्याने जास्तीचा भुर्दंड हे तर आणखीनच वेगळं त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा सुरु होऊनदेखील घरीच थांबावे लागत आहे. खाजगी वाहनाचा आधार घ्यायचा झाला तर पुसेशी प्रवाशी संख्या नसल्याने त्या वेळेत पोहचत नसल्याने थेट पालकांना मुलांना शाळेत पोहच करावे लागत असल्याने शाळा मुलाची सुरू झाली कि पालकांची हेच समजेनासे झाले. त्याच बरोबर वाढत आर्थिक भुर्दंड पडत आहेत ते मात्र वेगळं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT