Trimbakeshwar temple esakal
नाशिक

Trimbakeshwar Temple : संस्थेचे कार्यक्षेत्र नाशिकपर्यत वाढणार? देवस्थानच्या विश्वस्त निवडीसाठी सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्‍तांची निवड होणार असून त्यासाठी धर्मादाय आयुक्तालय कार्यालयाकडून अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र यात यावेळी चार विश्वस्‍तांसाठी त्र्यंबकेश्वरऐवजी नाशिक कार्यक्षेत्र वाढविले गेल्याने इच्छूकात संभ्रम आहे. (scope of organization will expand Notification for selection of trustees of trimbakeshwar temple nashik news)

बारा ज्योतीर्लिंगापैकी प्रमुख असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट्रवर चार भाविक प्रतिनिधी विश्वस्तांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी धर्मादाय सहआयुक्तालय कार्यालयाकडून सूचना जारी करण्यात आली असून इच्छुकांकडून विहित नमुन्यात अर्जही मागविण्यात आले आहे.

शुक्रवार (ता.२६) पासून ३० दिवसांत इच्छुकांना अर्ज दाखल करावे लागणार आहे. भाविक प्रतिनिधीसाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक महापालकिच्या सूचना फलकावर नोटीस लावण्यात आली आहे.

दरम्यान भाविक विश्वस्तांच्या नियुक्तीसाठी आतापर्यत कायमच त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीतील इच्छुकांचा विचार झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोबत यापूर्वीच्या निवडीवेळी तत्कालीन धर्मादाय सहआयुक्त प्रदीप बी घुगे यांनी ४ जुलै २०१८ च्या निकालपत्रात संस्थेच्या कार्यक्षेत्राविषयी स्पष्ट आदेश झालेला आहे.

त्यातील मुद्दा क्रमांक सातमध्ये विश्वस्त निवडीच्या प्रक्रियेदरम्यान त्र्यंबकेश्वर कार्यक्षेत्राचा स्पष्ट उल्लेख असताना यावेळी मात्र भाविक विश्वस्त निवडीसाठी नाशिक कार्यक्षेत्र वाढविण्यात आल्याने स्थानिक इच्छुकांच्या मनात चलबिचल वाढली आहे.

मंदिर गावात असताना स्थानिक पातळीवर विश्वस्तांना संधी मिळण्याऐवजी तीस चाळीस किलोमीटर दूर अंतरावरील शहरातील इच्छुकांना संधी का असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे निवडीपुर्वीच त्र्यंबकेश्वर भागातील इच्छुकांच्या मनात संभ्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

Breaking News Live Update: राहुरीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवर प्रचार; सुजय विखेंचीही घेतली भेट

Pune Village Jatra: दिवे गावच्या कातोबानाथ यात्रेला उत्साहाची झळाळी; कुस्ती आखाड्यात 220 मल्लांची दमदार हजेरी

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीया का साजरी केली जाते? या पौराणिक कथांशी आहे संबंध...

SCROLL FOR NEXT