second cycle was released to the kadava canal 
नाशिक

रब्बीसाठी कडवाचे आवर्तन सुटले; चौदाशे हेक्टरला होणार लाभ

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : रब्बी पिकांसाठी कडवा कालव्याला सोमवारी (ता. ८) दुसरे आवर्तन सोडण्यात आले. याद्वारे एक हजार ४०० हेक्टरवरील सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सिन्नरमधील वडांगळी प्रादेशिक योजना व पांगरी गावासाठी असणाऱ्या योजनेचे दोन तलाव भरून घेतले जाणार आहेत. 

जलसंपदा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता संतोष गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी बाराला २५० क्यूसेक क्षमतेने कालव्याला पाणी सोडण्यात आले. आवर्तन सुटल्यावर शिंदे येथून डोंगळे शोधमोहिमेला सुरवात करण्यात आली. म्हाळसाकोरे व सिन्नर तालुक्याच्या हद्दीत दोन दिवसांत डोंगळे काढण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. चार शाखा अभियंत्यांसह सहा कर्मचाऱ्यांची दोन पथके यासाठी तयार करण्यात आली आहेत. पाणीचोरी होऊ नये, यासाठी कालव्यावर नियमित गस्त घालण्यात येत आहे. वीस दिवस चालणाऱ्या आवर्तनाद्वारे एक हजार ४०० हेक्टरवरील गहू, हरभरा, फळबागा, मका आणि पिकांना लाभ होणार आहे. कालव्याच्या टोकाकडील पुतळेवाडीपासून पाणी वितरणाला सुरवात करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नियोजनाप्रमाणे सिंचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे. 

पाणीटंचाई होणार दूर... 

या आवर्तनात ६० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्याद्वारे वडांगळी प्रादेशिक पाणीयोजनेचा साठवण तलाव भरण्यात येईल. त्यामुळे योजनेतील समाविष्ट गावांना पुढील तीन महिने टंचाई जाणवणार नाही. पांगरी पाणीयोजनेसाठीही पंचाळे शिवारात डांबरनाला बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT