corona second patient 11.jpg 
नाशिक

दिलासादायक! ..तर जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त ठरणार नाशिकचा 'तो' रुग्ण.!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच नाशिकमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने इथेही धाकधूक वाढली. अशातच एक दिलासादायक बातमी घडली आहे. 

..तर जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त ठरणार नाशिकचा 'तो' रुग्ण.!

नाशिकच्या गोविंदनगर परिसरातील संशयीत रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट  (ता.४) पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज (ता.१८) त्याच पॉझिटिव्ह  रुग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या रिपोर्टमुळे सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. आता या रुग्णाचा तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त रुग्ण ठरणार आहे. सुमंगल सोसायटी, मनोहर नगर, गोविंदनगर परिसरात हा कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुमंगल सोसायटीच्या त्रिज्यापासून तीन किलोमीटरचा परिसर पंधरा दिवसांसाठी प्रतिबंधित केला.

पालकमंत्र्याच्या निवासस्थानाचा परिसरही सील

 नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानापासून एक दीड किलोमीटर अंतरावर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. यानंतर मनोहर नगर, गोविंदनगरपासून तीन किमी परिसर सील करण्यात आला होता.  त्यावेळी महापालिका आयुक्तांनी या परिसराला भेट दिली होती. मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारीही सोमवारी (ता.६) उपस्थित होते. या परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

माजी सरन्यायाधीश राज्यसभेतून निवृत्त, ६ वर्षात एकही प्रश्न विचारला नाही, चर्चेत एकदाच सहभाग त्यातही वादग्रस्त विधान

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar News: बारवेलगत अतिक्रमणाचा डाव उधळला; महापालिकेची कारवाई; समर्थनगरमध्ये पत्र्याचे शेड हटविले

Sambhajinagar Hospital News: घाटीवरील ताण कमी होणार; १८९ कोटींचे माता-बाल रुग्णालय लवकरच सुरू; दूध डेअरी परिसरात अत्याधुनिक महिला रुग्णालय

SCROLL FOR NEXT