thermal power station nashik  
नाशिक

औष्णिक वीज केंद्राचे महत्व पुन्हा अधोरेखित! ग्रीड स्टेबिलिटीसाठी दुसरा संच सुरू होणार

नीलेश छाजेड

नाशिक/एकलहरे : गुजरात मधील नवसारी वीज वहन करणाऱ्या पारेषणच्या लाईन मध्ये दुरुस्तीचे काम निघाल्याने नाशिक औष्णिक वीज केंद्राचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्र-गुजरात दरम्यान वीज वहन करणाऱ्या लाईनच्या दुरुस्तीसाठी परमिट घेण्यात आले आहे. त्यामुळे ग्रीड स्टेबिलिटीसाठी नाशिकचा आणखी एक संच सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

ऑक्टोबरमध्ये बारा तारखेला ग्रीड फेल झाल्याने मुंबईची बत्ती गुल झाली होती तेव्हा नाशिक औष्णिक वीज केंद्राचा एक संच सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. नवसारी लाईनचे काम निघाल्याने आज मध्यरात्रीपर्यंत संच क्रमांक तीन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा संच पंधरा नोव्हेंबर पर्यंत सुरू रहाणार आहे.

स्टेबिलिटीसाठी नाशिक महत्वाचे

नाशिक औष्णिक वीज केंद्राने आजवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. चाळिशीतले संच असल्याने वीज निर्मिती दर वाढलेले दिसून येतात किंवा आकडेवारी वाढवून दाखवली जाते. नवीन संच स्थापित झाल्यास त्याचा निर्मिती दर कमी येऊ शकतो. ग्रीड स्टेबिलिटीसाठी नाशिक महत्वाचे आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे तरी नाशिकला डावलले जाते आहे हे विशेष आहे.

तर केंद्र बंद करण्याचा विचार सोडावा लागेल..

आजवर ज्या ज्यावेळी महानिर्मितीला वीज निर्मितीत अडचण आली आहे त्या त्या वेळी नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या कामगार अभियंता यांच्यासह सर्व अधिकारी वर्गाने पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करून येथील चाळिशीतील संचांची गुणवत्ता सिद्ध केली आहे.
सध्या राज्यातील वीजेची मागणी ही वाढती दिसून येत आहे. आज राज्याची वीजेची मागणी १९ हजार ६०० होती तर राज्याच्या सर्व स्रोतातून १३ हजार ५०० मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती . भविष्यात वीजेची मागणी जर आणखी दोन अडीच हजार मेगा वॅट ने वाढली, तर येथील किमान २ संचांमधून वीज निर्मिती कायम सुरू राहील व भविष्यात नाशिक औष्णिक वीज केंद्र बंद करण्याचा विचार सोडावा लागेल असेच चित्र दिसते.

ग्रीड स्टेबिलिटीसाठी व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने नाशिक औष्णिक वीज केंद्राचा दुसरा संच सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- मोहन आव्हाड, प्रभारी मुख्य अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

SCROLL FOR NEXT