security of NMC fine Review by Assistant Commissioner in background of Parliament Constitution nashik esakal
नाशिक

NMC News: महापालिकेची सुरक्षा ठीकठाक! संसद घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सहाय्यक आयुक्तांकडून आढावा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला बावीस वर्षे पूर्ण होत असतानाच सभागृहाचे अभेद्य सुरक्षाकवच भेदून लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन युवकांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी घेत रासायनिक धूर सोडल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेसह शासकीय कार्यालयांची सुरक्षा तपासणीचे आदेश त्या विभाग प्रमुखांनी दिले.

त्याअनुषंगाने महापालिकेच्या सुरक्षेचा आढावा गुरुवारी (ता.१४) सहाय्यक आयुक्त नितीन नेर यांनी घेतला. या वेळी ठीकठाक सुरक्षा असल्याचे आढळले.

त्यानंतरही महापालिका मुख्यालयात कामानिमित्त ये-जा करणाया नागरिकांकडील बॅगा तपासणी तसेच अनोळखी व्यक्तींचे ओळख प्रमाणपत्र तपासूनच प्रवेश देण्याच्या सूचना नेर यांनी दिल्या. (security of NMC fine Review by Assistant Commissioner in background of Parliament Constitution nashik)

सहाय्यक आयुक्त नितीन नेर यांनी महापालिका मुख्यालयातील सुरक्षेचा आढावा गुरुवारी सकाळी घेतला. महापालिकेत २०१७ पर्यंत महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी कार्यरत होते.

परंतु मंत्री बच्चू कडू व तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अपंगांच्या प्रश्‍नावर बैठक सुरू असताना वादाचे प्रकार झाल्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना नियुक्त करण्यात आले.

त्यावर पालिकेचे वार्षिक आठ ते नऊ कोटी रुपये खर्च होतात. सध्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे ३३ सुरक्षारक्षक आहेत. यात महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन मध्ये १९ सुरक्षा रक्षक तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहे.

त्या व्यतिरिक्त पालिकेचे सुरक्षारक्षक त्यांना मदत करतात. महापालिकेत प्रवेश करण्यासाठी चार मुख्य प्रवेशद्वार आहेत. तनिष्क शोरूमला लागून मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार रामायण बंगला व त्याच्या बाजूला असलेल्या पार्किंग स्टॅन्डकडे जाण्यासाठी असे चार प्रवेशद्वार आहे.

प्रशासक राजवट असल्याने रामायणाच्या बाजूचे प्रवेशद्वार कायमस्वरूपी बंद आहे. तनिष्क शोरूम बाजूचे प्रवेशद्वार वाहनधारक कर्मचारी वापरतात, तर मुख्यत्वे स्थायी समिती समोरील व मुख्यालयाचे प्रवेशद्वाराचा अधिक वापर होतो.

चारही प्रवेशद्वारात सिक्युरीटी ठेवण्यात आली आहे. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर दोन ठिकाणी सुरक्षारक्षक आहे. विभागप्रमुखांच्या कार्यालयाच्या बाहेरदेखील सुरक्षारक्षक आहेत. मुख्यालयातील सुरक्षसेवेचा आढावा श्री. नेर यांनी घेतला.

अशी आहे सुरक्षेची स्थिती

- राजीव गांधी भवन- १९

- महापालिका आयुक्त निवासस्थान- ६

- गंगापूर धरण- ४

- पंचवटी फिल्टर प्लान्ट- ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT