Dada Bhuse news
Dada Bhuse news 
नाशिक

Nashik News : वृद्ध कलाकार निवड समिती गठित; 354 अर्जांचा मार्ग खुला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांना समाजकल्याण विभागाच्यावतीने मानधन दिले जाते. सत्तांतर झाल्यानंतर या समित्या बरखास्त करण्यात आल्या होत्या. (Senior Artist Selection Committee formed and way of 354 applications received at ZP was opened nashik news)

पालकमंत्री दादा भुसे यांच्या आदेशान्वये आलेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी लागणारी समितीची पुनर्रचना झाली असून समिती गठित झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेल्या ३५४ अर्जाचा मार्ग खुला झाला आहे. पालकमंत्री भुसे यांच्या बैठकीची आता प्रतिक्षा आहे. ही तारीख प्राप्त झाल्यास अर्जाची निवड होऊन कलाकरांना मानधन वितरित होईल.

शासनाकडून दर महिन्याला वृद्ध कलाकारांना श्रेणीनुसार तुटपुंजे मानधन दिले जाते. मानधन देण्यासाठी आलेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी पालकमंत्री समितीची जिल्हा परिषदेतून स्थापना करतात. या समितीमध्ये अशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असतो. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये राज्यभरातील सर्व निवड समिती रद्द करण्यात आली.

पालकमंत्री यांच्या नियुक्ती होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर या समितीची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने या समितीची पुनर्रचना करत सदस्यांची नावे निश्चित करत ही यादी पालकमंत्री भुसे यांच्याकडे पाठविली. पालकमंत्री भुसे यांनी यादीस मान्यता दिली. त्यामुळे अर्ज निवड समिती गठित झाली आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत वृद्ध कलाकारांकडून अर्ज मागविण्यात येतात. त्यानंतर जानेवारी ते मार्च या कालावधीत समितीच्यावतीने अर्जाची छाननी होते. आलेल्या अर्जातून १०० कलाकारांची मानधनासाठी निवड केली जाते. पात्र लाभार्थ्यांची निवड करून शासनाकडे पाठविण्यात येतात.

त्यानंतर सांस्कृतिक संचालनालयामार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात येतात. यंदा ३७७ कलाकारांनी मानधनासाठी अर्ज केला आहे. संबंधितांची अर्जाची छाननी केली असता २३ अर्ज बाद झाले असून ३५४ अर्ज वैध झाले आहेत.

या अर्जाची समितीमार्फत छाननी होईल. अ श्रेणीतील वृद्ध कलाकारांना दरमहा ३१५० रुपये दिले जातात. तसेच व श्रेणीतील कलाकारांना २७०० रुपये आणि क श्रेणीतील कलाकारांना २२५० रुपये प्रमाणे मानधन मिळते. अतिशय तुटपुंजे मानधनही मिळत नसल्याने कलाकरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

समिती सदस्य असे

ह.भ.प. श्रावण उत्तम अहिरे (अध्यक्ष), सुनील ढगे (उपाध्यक्ष), वंदना अत्रे, नंदा पुणेकर ऊर्फ नंदा बाबासाहेब गोरे, कृष्णा भामरे, सौरभ जाधव, माणिकराव देशमुख, दत्तात्रेय तांबे, भाऊसाहेब निकम (सदस्य). उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, विभागीय कार्यालय सांस्कृतिक संचालनालयाच्या सहाय्यक संचालक सुनीता अस्वले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे (सदस्य)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT