mother on road.png 
नाशिक

VIDEO : ह्रदयद्रावक! लॉकडाऊनमध्ये माऊलीच्या नशिबाची दैना..वंशाचे दोन-दोन दिवे असूनही तिचे जीवन रस्त्यावरच!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पती होते तोपर्यंत संसाराचे सर्व काही सुरळीत... पतीचे निधन झाले. दोन मुले असूनही घरात निवारा नाही. माहेरी गेली... वडिलांचे निधन झाले. जो आसरा होता तोही गेला. दिवसभर भटकायचे अन्‌ रात्री जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आपला निवारा शोधायचा... वंशाचे दोन-दोन दिवे तरी तिच्या नशिबात अंधार अशी अवस्था झाली आहे सिडकोतील मूळ रहिवासी असलेल्या वृद्धेची. 

सिडकोतील वृद्धेला जिल्हा रुग्णालयाचा आधार 

सायंकाळचे पाच वाजलेले. सगळीकडे शुकशुकाट. जिल्हा न्यायालयासमोरच्या बसथांब्याच्या चबुतऱ्यावर एका सुस्थित घरातील साधारण साठीतील महिला बसलेली. राहणीमान नीटनेटके... जवळ स्वतःच्या गरजेपुरते सामान असलेली पिशवी. लॉकडाउनमुळे सगळीकडे शुकशुकाट असताना ही महिला का बसली असावी म्हणून तिला बोलते केले. चार वेळा नाव विचारून सांगत नव्हती. सिडको परिसरात घर आहे. पतीचे निधन झालेले. दोन मुले आणि मुलगी. सर्वांची लग्ने झालेली. मुले सांभाळत नसल्याने आई-वडिलांकडे राहत होती. मात्र वडिलांचेही निधन झाल्याने आता कोणीच आसरा देत नाही. गेल्या काही दिवसांपासून फुटपाथवरच राहून दिवस ढकलत आहे. रात्री जिल्हा रुग्णालयाच्या परिसराचा आसरा घेत आहे. दोन मुले आणि एक मुलगी आहे. सर्व जण आपापल्या संसारात रममाण झालेले आहेत. एक मुलगा गॅरेज चालवितो, तर दुसरा मुलगा मुंबईला एका कंपनीत आहे. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सगळीकडे लॉकडाउन केले आहे. सर्व जण स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी घरातच कोंडून घेत आहेत. मात्र या माउलीला कोणी आधारच देत नसल्याने स्मार्ट रोडच्या फुटपाथचा आसरा घ्यावा लागत आहे.

(video - सोमनाथ कोकरे)

पूर्ण रस्ता ओस पडला आहे. मात्र जिल्हा न्यायालयासमोरच फुटपाथवर असलेल्या बाकड्यांवर ती एकटीच बसून राहते. शून्य नजरेतून सगळा भोवताल न्याहाळत असते. मात्र कुणी तिची साधी विचारपूसही करीत नाही. कुणी काही बिस्किट दिले, जेवण आणून दिले तर त्यावरच ती पोटाची खळगी भरते. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे कोरोनासारख्या महामारीत प्रत्येक जण स्वतःला जपत आहे आणि ही माउली मात्र रात्रीचा आसरा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचा परिसर गाठते. रात्रभर त्या परिसरात पाठ टेकल्यानंतर पुन्हा दिवस उगवला की सकाळच्या वेळी कन्या शाळेसमोर आणि सायंकाळी जिल्हा रुग्णालयासमोर फुटपाथवर राहून ही माउली एक-एक दिवस ढकलत आहे. कुठेतरी राहण्याची सोय व्हावी, दोन घास अन्न मिळावेत, एवढीच अपेक्षा ही माउलीने व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : महाराष्ट्र हादरला ! काँग्रेस नेत्याकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, बेडरुममध्ये नेऊन अंगावर पेट्रोल ओतले अन्...

शोध सावित्रीबाई आणि जोतीबांच्या पाऊल खुणाचा

CM Yogi Adityanath: बिहारच्या रिंगणात ‘बुलडोझर बाबां’चा प्रचार; योगी आदित्यनाथांच्या दोन डझन सभा, ‘महाआघाडी’वर जोरदार प्रहार

Latest Marathi Breaking News : आजपासून नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम

Kishori Girls: पुणे ग्रामीण-अहिल्यानगरमध्ये जेतेपदाची लढत रंगणार; राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी

SCROLL FOR NEXT