safai krmchari.jpg 
नाशिक

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कोणी वाली नाही का?...तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर कुऱ्हाड

महेश भामरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणू संसर्ग फैलावामध्ये कुणालाही घरी पाठवायचे नाही, असे सरकार एकीकडे म्हणतेय. पण दुसरीकडे मात्र राज्यातील पाणी व स्वच्छता विभागातील जिल्हा आणि तालुकास्तरीय तेराशे जणांच्या ३१ जुलैला सेवासमाप्तीचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे आपत्तीच्या काळात १५ ते २० वर्षे उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. 

कोरोनात बेरोजगारीची कुऱ्हाड 

उघड्यावरील हागणदारी बंद करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारने उघड्यावर आणले आहे. पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलस्वराज्य प्रकल्प टप्पा २ व जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीत कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांनी उमेदीचे वय या सेवेत दिले आहे. आताही कोरोना संसर्गामध्ये स्वच्छतेबाबत गावस्तरावर अनेक स्वच्छताविषयक जनजागृतीचे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. 

आउट सोर्सिंगची शक्यता 

मोठ्या खासगी पुरवठादारांना खूश करण्यासाठी आउटसोर्सिंगद्वारे कर्मचारी भरती राबविण्याचे कारस्थान सरकारच्या स्तरावरून सुरू असल्याची कुणकुण एव्हाना सेवेवर पाणी सोडावे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागली आहे. जे कर्मचारी १५ वर्षांपासून आपली सेवा देत आहेत, त्यांचे मानधन वाढविले नाही. उलट त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कोणी वाली नाही का? 

महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला. पाणी व स्वच्छतेत महाराष्ट्राने अनेक वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाणी व स्वच्छतेच्या कामामुळे जिल्हाधिकारी पदावर बढती मिळाली. त्यामुळे आता प्रश्‍न अनुत्तरित राहतो तो म्हणजे, तोकड्या मानधनावर राबवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वाली कोणी नाही का? वयाची चाळिशी पार केलेल्यांनी काय करायचे? 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT