assault esakal
नाशिक

Nashik Crime News : साडेसतरा वर्षीय युवती गर्भवती; म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाविद्यालयीन अल्पवयीन युवतीशी ओळख वाढवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. याप्रकरणी संशयित युवकाविरोधात म्हसरुळ पोलिसात बलात्कारासह पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Seventeen half year old young girl pregnant case registered in Mhasrul police Nashik Latest Crime News)

सर्वेश गोपाळ निकुंभ (२४, रा. दरी मातोरी, ता. जि. नाशिक) असे संशयित तरुणाचे नाव आहे. साडेसतरा वर्षीय पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, ती दरी-मातोरी परिसरातून दररोज शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी ये-जा करते. यादरम्यान, संशयित सर्वेश याने तिच्याशी ओळख वाढविली. याच दरम्यान १ जून ते ५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये संशयित सर्वेश याने पीडितेला मखमलाबाद गावातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केले.

यातूनच पीडितेला गर्भधारणा राहिल्याने तिने म्हसरुळ पोलिसात सर्वेशविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार, बलात्कारासह पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक व्ही. के. माळी हे करीत असून अद्याप संशयितास अटक नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT