Seventh Pay Commission will be implemented in January nashik marathi news 
नाशिक

सातवा वेतन आयोग जानेवारीत लागू! एप्रिलपासून अंमलबजावणी; मनपा प्रशासनाचा निर्णय 

विक्रांत मते

नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने बहुप्रतिक्षेत असलेला सातवा वेतन आयोग जानेवारीत लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नवीन आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिलपासून प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल. 

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. परंतु वेतन आयोग लागू करताना राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समकक्ष वेतनश्रेणीपेक्षा अधिक वेतन असावे, अशी अट टाकण्यात आल्याने वादाला तोंड फुटले. यापूर्वी राज्य शासनाने वेतननिश्चितीला मान्यता दिल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर वेतनश्रेणीची मागणी करण्यात आली. आयुक्त कैलास जाधव यांच्या सूचनेवरून वेतननिश्चिती करण्यासाठी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. वेतननिश्चितीचा अहवाल शासनाला सादर करावा लागणार असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने कामकाज सुरू केले आहे. मात्र विलंब होत असल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते बोरसे, गटनेते विलास शिंदे, कामगार नेते प्रवीण तिदमे यांनी आयुक्तांची भेट घेत वेतन आयोग लागू करण्याबरोबर पदोन्नती देण्याची मागणी केली. स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी वेतन आयोग लागू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्रशासनाने तातडीने पावले उचलत जानेवारीत कुठल्याही परिस्थितीत आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली. 

तेरा पदांचा तिढा 

महापालिकेत विविध संवर्गातील १८२ पदे असून, शासनाच्या समकक्ष असलेले १६९ पदांचा तिढा संपुष्टात आला आहे. तेरा पदांबाबत अद्यापही तांत्रिक अडचण असून, ७ जानेवारीच्या समितीच्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे. सुधारित वेतनश्रेणी १ एप्रिल २०१९ पासून लागू केली जाईल. नव्या वेतन आयोगामुळे साडेतीन कोटींचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

फरकाच्या रकमेबाबत अनिश्चितता 

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग २०१६ पासून लागू केला जाईल. त्यामुळे आतापर्यंतच्या फरकाची रक्कम महापालिकेला देय असली तरी त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवरील घेण्याच्या सूचना आहे. त्यामुळे वेतन फरकाच्या रकमेबाबत अनिश्चितता मानली जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

का झाला हृतिक रोशन- सुझान खानचा घटस्फोट? भाऊ जायेदने सांगितलं कारण, म्हणाला- हृतिकची गर्लफ्रेंड

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

आनंदी मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम; सकाळ वृत्तपत्राच्या सहाय्याने केला ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग

SCROLL FOR NEXT