Crime News esakal
नाशिक

संतापजनक! कंत्राटी कर्मचारी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

तक्रारदार महिलेच्या सांगण्याप्रमाणे तब्बल चार वर्षे (वर्ष २०१७ ते २०२१) हा प्रकार सुरूच होता.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महावितरण कंपनीत करार पद्धतीवर कार्यरत महिलेकडे विभागातील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने शरीर सुखाची मागणी केली तर, दुसऱ्या एकाने गैरवर्तन करीत विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिताने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, जळगाव महावितरण कार्यालयातील एका वरिष्ठाने विभागातील एका कंत्राटी महिला कर्मचारीकडे शरीर सुखाची मागणी केली. तक्रारदार महिलेच्या सांगण्याप्रमाणे तब्बल चार वर्षे (वर्ष २०१७ ते २०२१) हा प्रकार सुरूच होता. असे असताना १२ मे रोजी कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्याने पुन्हा महिला कर्मचारीकडे शरीरसुखाची मागणी करत गैरवर्तन केले. मागणी मान्य न झाल्याने मानसिक छळ व त्रास देत पीडितेला कामावरून काढून टाकण्यात आले. हे कमी की, काय म्हणून कार्यालयातील त्याचा साथीदार असलेल्या दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने ‘मी तुला घरी सोडतो’ असे म्हणत पीडितेशी अंगलट केली. तिचा विनयभंग केला. पीडिताच्या तक्रारीवरून दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

अटकेसाठी आंदोलन

महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांविरोधात जळगाव परिमंडळ महावितरण संयुक्त कृती समितीतर्फे द्वार सभा घेत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच संशयितांना अटक करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT