Sharad Pawar  esakal
नाशिक

Sharad Pawar Latest Update : मोठ्या साहेबांची सभा नव्या राजकीय समीकरणांची नांदी! सभेला शिवसेनेचे हे आमदारही सरसावले

संतोष विंचू

Nashik Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रमुख शरद पवारांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट गेल्याने राज्यात नवी राजकीय समीकरणे तयार झाली आहे. या घडामोडीनंतर खुद्द शरद पवारांची पहिली सभा भुजबळांच्या बालेकिल्ल्यात दुपारी तीनला होणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे यांनी सभेची जोरदार तयारी केलीच पण इतर नेत्यांचीही सांगड घातली आहे. (sharad pawar yeola meeting is beginning of new political equations nashik news)

एकेकाळचे त्यांचे सहकारी माजी आमदार मारोतराव पवार, शिवसेनेचे (ठाकरे)आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख कुणाल दराडे देखील या सभेसाठी पुढे सरसावले आहेत. याचमुळे येथील राजकीय पटलावर देखील नवे समीकरणे मोठ्या पवारांच्या या सभेतून निर्माण होऊ शकतात.

२००४ मध्ये येवल्यासाठी अगदी नवख्या असलेल्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी ज्या बाजार समितीच्या सभामंडपात आग्रह सभा झाली होती, त्याच सभागृहात येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या पुढाकारातून शरद पवारांची सभा होत आहे.

२००४ मध्ये भुजबळांना येथून उमेदवारी द्या, असा हट्ट धरत शिंदेंनी थेट पवारसाहेबांपुढे घोषणाबाजी केली होती, आज हेच समीकरण पूर्णतः विरोधाभासाचे झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत भुजबळांच्या विरोधात प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेश चिटणीस असलेल्या शिंदे यांना थेट पक्षातून निलंबित केले होते.

तीन वर्ष ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत असलेल्या शिंदे यांनी मात्र अजितदादांसोबत येथील आमदार भुजबळही गेल्याने मोठ्या पवारसाहेबांच्या समर्थनार्थ जबाबदारी खांद्यावर घेतली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येवल्यातील आजच्या सभेला मारोतराव पवारांसह शिवसेनेचे दराडेही सरसावले

किंबहुना सिल्वर ओकला जाऊन भेट घेत येवल्यात पहिली सभा घेण्याचा आग्रह करत या सभेला अंतिम रूप दिले आहे. या मतदारसंघात आजही शरद पवारांचे वलय असल्याने ही सभा भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरेल का, याकडे राजकीय धूरिणांचे लक्ष लागले आहे.

मारोतराव पवारही रिंगणात

येथील माजी आमदार मारोतराव पवार व शरद पवार पुलोद सरकारमधील सहकारी आमदार होते तेव्हापासून बारामतीशी मारोतरावांचे स्नेहाचे नाते आहे. मध्यंतरी उमेदवारीसाठी पवार कुटुंबीयांना शिवसेनेचा रस्ता धरावा लागला असला तरी मोठ्या साहेबांशी स्नेहाचे नाते संपलेले नाही.

याच नात्याला वृद्धिंगत करत स्वतः मारोतराव पवार उद्याच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. आज त्यांनीही सभास्थळी उपस्थित राहून नियोजनाचा आढावा घेतला, तसेच सोशल मीडियातून आवाहन करत समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे उद्याच्या सभेला अजून वेगळे महत्त्व येणार आहे.

शिवसेना उतरली रिंगणात

महाविकास आघाडी म्हणून शिवसेना सोबत राहणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर केले आहे.

किंबहुना उद्याच्या सभेसाठी शिवसेनेने उपस्थित राहावे, अशा सूचना देखील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून आज करण्यात आल्या.

त्यामुळे विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांच्यासह शिवसेना या सभेत ताकदीने सहभागी होणार आहे. किंबहुना सभेच्या नियोजनातही शिवसेनेचे सहकार्य व योगदान मिळाले आहे. शिवसेनेसह काँग्रेसचाही सहभाग राहणार असल्याने उद्याची सभा राजकीयदृष्ट्या वेगळीच ठरेल, हे नक्की!

भुजबळ गट अलिप्त

मंत्री भुजबळांच्या बालेकिल्ल्यात ही सभा होणार आहे. असे असले तरी भुजबळ गटाकडून अद्याप याविषयी ‘ब्र’ शब्दही काढलेला नसून पवारसाहेबांच्या स्वागताच्या प्रतिक्रिया येत आहेत. किंबहुना आम्ही सभेला कुठलाही विरोध करणार नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ समर्थक दिलीप खैरे यांनी दिली आहे.

"ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांचे व माझ्या परिवाराचे गेल्या ४० वर्षांपासून सेन्हाचे नाते आहे. राज्यस्तरीय अनेक महत्त्वाची पदे त्यांनी मला दिली असून, याची मला जाणीव आहे. त्यामुळे साहेबांसाठी लढू आणि जिंकूही. पुनर्वसन केल्यानंतरही भुजबळांनी आता बंड केल्याने मतदारसंघातून मोठी नाराजी आहे. भुजबळांना जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. आजच्या सभेला जिल्हाभरातून सुमारे दहा ते १५ हजार समर्थक उपस्थित राहतील." -माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT