friends boy and girl.png 
नाशिक

धक्कादायक प्रकार! मैत्रीसाठी काय पण? मित्रासाठी 'तिने' वाढदिवशी केले असे..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या रविवारी (ता. 14) जानकी यांच्या घरात वाढदिवसाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी त्यांची नणंद आणि त्यांची 15 वर्षांची नात या दोघी आल्या होत्या. रविवारी रात्री त्या मुक्कामी राहिल्या आणि सोमवारी दुपारी परतल्या. सर्व पाहुणे घरी गेल्यानंतर जानकी यांना काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आल्याने त्यांना धक्काच बसला..

असा घडला प्रकार

मुंबई नाका परिसरात राहणाऱ्या जानकी राजेंद्र नागपाल यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता. 14) त्यांच्या घरात वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी शालिमार परिसरात राहणाऱ्याच्या त्यांचा नणंद आणि त्यांची 15 वर्षांची नात या दोघी आल्या होत्या. रविवारी रात्री त्या मुक्कामी राहिल्या आणि सोमवारी (ता.15) दुपारी शालिमारलाही परतल्या. त्यानंतर श्रीमती नागपाल यांना घरातून रोकड व सोन्याचे दागिने असा 6 लाख 59 हजार 720 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ मुंबई नाका पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला आणि अवघ्या दोन तासामध्ये गुन्ह्यांची उकल होऊन पोलिसांनी 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह तिच्या मित्राला अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अल्पवयीन मुलीसह तिच्या मित्राला अटक

जवळच्या नातलगाच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आजीसोबत गेलेल्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने त्याच घरातून रोकड व सोन्याचे दागिने असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरला. या मुलीने चोरलेला ऐवज मित्राला मोबाईल आणि दुचाकी खरेदी करण्यासाठी दिला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये छडा लावत संशयित अल्पवयीन मुलीसह तिच्या मित्राला अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


तिने मित्रासाठी केली चोरी 
संशयित अल्पवयीन मुलीच्या मित्राला मोबाईल आणि दुचाकी घ्यायची होती परंतु त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे आजीसोबत ती वाढदिवसाला गेली. त्या रात्री तिने श्रीमती नागपाल यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा साडेसहा लाखांचा ऐवज चोरला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तिने तिच्या मित्राला नागपाल राहत असलेल्या घराजवळ बोलावून घेत, त्याच्याकडे चोरीचा ऐवज दिला. त्यानंतर दुपारी आजीसोबत ती शालिमारला घरी आली. मात्र नागपाल यांनीही तिच्यावरच संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर जवळच्या नातलगामार्फत तिची चौकशी केल्यानंतर तिने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ तिचा मित्र दीप धनंजय भालेराव (20) यास अटक केली. त्याच्याकडून चोरीचा 26 हजार 100 रकमेसह 2 लाख 40 हजार 820 रुपयांचा ऐवज जप्त करीत दोघांना अटक केली. सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळ, साजिद मन्सुरी, हवालदार बहारवाल यांनी ही कामगिरी अवघ्या दोन तासात बजावली. सहाय्यक निरीक्षक सोमनाथ गेंगजे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT