Officials along with retired Justice Sandeep Shinde, chairman of the committee, held a meeting on Kunbi Maratha reservation on Saturday. 
नाशिक

Maratha Reservation: कुणबी मराठा नोंदींसाठी नाशिक जिल्ह्यातील सरसकट अभिलेख तपासावे : न्यायमूर्ती शिंदे

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation: कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जात नोंदणीची कागदपत्रांची तपासणी केवळ महसूल अभिलेख पुरती मर्यादित न ठेवता इतर विभागांबरोबरच नागरिकांकडे उपलब्ध असलेले सबळ पुरावे किंवा नाशिक जिल्ह्याप्रमाणे पुरोहित संघ अशा संस्थांचीही मदत घ्यावी, तसेच ८ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, अशा सूचना शिंदे समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी दिल्या.

नाशिक रोडला विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन कक्षात समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी समितीतर्फे या सूचना देण्यात आल्या. (Shinde Committee Chairman Justice Sandeep Shinde statement Check archives for Kunbi Maratha records nashik news)

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, समितीचे उपसचिव विजय पवार, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, ॲड. अजिंक्य जायभावे, जिल्हाधिकारी जलज शर्मा (नाशिक), सिद्धराम सलीमठ (नगर), अभिनव गोयल (धुळे), आयुष प्रसाद (जळगाव), मनीषा खत्री (नंदुरबार), मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, उपायुक्त रमेश काळे, विठ्ठल सोनवणे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आदींसह जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी भूमी अभिलेख विभाग, जिल्हा निबंधक व मुद्रांक नोंदणी विभाग, शिक्षण विभाग, पोलिस व कारागृह विभाग यासह विविध विभागांकडील नोंदींबाबतही सविस्तर माहिती जाणून घेतली. संबंधित विभागांनी तसेच इतर लिपीतील नोंदींबाबत संबंधित भाषा जाणकारांची मदत घेण्यात यावी, ८ डिसेंबरपर्यंत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी समितीकडे अहवाल पाठवावा, असेही निर्देश दिले.

विभागीय आयुक्त गमे यांनी उत्तर महाराष्ट्रातील तपासलेली कागदपत्रे व कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबीच्या नोंदींची माहिती दिली. जन्म-मृत्यूच्या नोंदी व शैक्षणिक अभिलेखात मोठ्या प्रमाणात, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदी आढळल्याचे सांगितले. जिल्हा जात पडताळणी समितीने पाच वर्षांत वैध-अवैध ठरविलेल्या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांबाबतची माहिती दिली.

नोंदी तपासण्यासाठी नाशिक जिल्हा पुरोहित संघाचीही मदत घेण्यात येत असून, सदर संघाच्या अभिलेख तपासणीसाठी शासनस्तरावरून यंत्रणा नियुक्त करून अभिलेखांचे व्यावसायिक पद्धतीने स्कॅनिंग व अपलोडिंग केल्यास राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांच्या कुणबी नोंदणी आढळून येतील. कुणबी नोंदी स्कॅन करणे व अपलोड करणे यासाठी निधीची, मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

मोडी, ऊर्दू भाषेतील नोंदी वाचून मराठीत भाषांतरित करण्याकरिता मोडीवाचक, ऊर्दूवाचक यांना मानधन देणे अथवा तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी स्वरूपात नियुक्ती देण्याबाबत विचार व्हावा. जीर्ण नोंदींचे जतन करण्याचे धोरण ठरवावे. नोंदीचा डेटा स्कॅन करून वेबसाइटवर अपलोड करण्यासाठी सर्व्हरवर जागा उपलब्ध व्हावी. आवश्यक सॉफ्टवेअर, पोर्टल, लिंक या तांत्रिक बाबीबाबत धोरण ठरविले जावे, आदी सूचना मांडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT