A crowd of activists gathered at Shivtirtha here. esakal
नाशिक

Shiv Jayanti 2023 : मालेगावला शिवजयंतीचा जल्लोष; शिवतिर्थावर लोटला जनसागर

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरात विविध संस्था, संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात झाले. शिवतीर्थावर मध्यरात्री बारापासूनच शिवरायांचा जयजयकार करत हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

दिवसभर शिवरायांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यासाठी सर्व स्थरातील नागरीक शिवतिर्थावर येत होते. सायंकाळी उशिरा मिरवणुकांना सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत शिवतीर्थावर जनसागर लोटला होता. पालकमंत्री दादा भुसे यांनी मध्यरात्री शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. (Shiv Jayanti 2023 celebrations in Malegaon nashik news)

शिवतिर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवतिर्थावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

सामाजिक संस्था, संघटनांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील मिरवणुका सायंकाळी सातनंतर सुरु झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर गर्दीने फुलून गेला होता.

महापालिका उपायुक्त सुहास जगताप, सहाय्यक आयुक्त राजू खैरनार, सुनील खडके, सचिन महाले आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. महापालिका मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सहाय्यक आयुक्त श्याम बुरकूल, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक बळवंत बाविस्कर, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, आस्थापना पर्यवेक्षक तौसिफ शेख, अतिक्रमण अधीक्षक शाम कांबळे, उद्यान अधिक्षक निलेश पाटील, रोखपाल दिनेश मोरे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंदसिंग पाटील, एकबाल जान मोहम्मद आदी उपस्थित होते.

बौद्ध महासभेतर्फे अभिवादन

भारतीय बौद्ध महासभेतर्फे सोयगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष गौरव पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. शोभा निकम, यमुना केदारे, ज्योती जगताप, भागूबाई निकम, आशा केदारे, प्रमिला आहिरे, कल्पना केदारे, नंदिनी केदारे, जयश्री उशिरे, चंद्रकला आहिरे, वंदना केदारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

काकाणी नगर वाचनालय

येथील काकाणी नगर वाचनालयात अजय शाह यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ग्रंथांचे प्रदर्शन वाचनालयात भरविण्यात आले होते.

पुरुषोत्तम तापडे, सुरेंद्र टिपरे, रविराज सोनार, अजय जोशी, संजय जगताप, प्रा. रंगी, रोहिण सोनवणे, तुषार चौधरी, जीवन पवार, नागेश आव्हाड, खंडेराव पाटील आदींसह बहुसंख्य पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

कामगार कल्याण मंडळ

कामगार कल्याण मंडळातर्फे झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर नारायण पाथरे यांनी माहिती सांगितली. हिरामण शेलार, दीपक गुप्ता आदी उपस्थित होते.

शिवजयंतीनिमित्त गंभीर आजाराअंतर्गत कामगारांना आर्थिक सहायता लाभ प्रमाणपत्र केंद्र संचालक मिलिंद पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तात्यासाहेब मोरे, ज्ञानेश्वर शेवाळे, विकी देवरे, विलास भारती, सिताराम कांबळे, प्रदीप शिंदे, सावंत, केडा यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

सावतानगर येथे कार्यक्रम

येथील संगमेश्‍वरातील सावतानगर येथे माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते लालचंद पांडे व किशोर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले.

चंदूभाई पटेल, प्रकाश गुरव, गोटू जोशी, तुकाराम पगारे, अरुण माळी, राजू गवळी, हिरामण मंडळ, रवी गुरव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT