shivpremi cidco.jpg 
नाशिक

....ही बाब समजताच "शिवप्रेमी' भडकले..वातावरण चिघळले..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका सिडको विभाग अतिक्रमण निर्मूलन कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. 20) सेंट्रल पार्क येथील "शिवछत्रपती उद्यान' नामफलक काढल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या सोनालीराजे पवार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय कार्यालयात शिवप्रेमींनी ठिय्या देत प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविला. 

असा घडला प्रकार...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी (ता. 19) राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसचे सिडको अध्यक्ष विशाल डोके यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल पार्कचे "शिवछत्रपती उद्यान' असे नामकरण करावे, अशी मागणी करत नामफलकाचे उद्‌घाटन केले होते. महापालिका कार्यालयाला तक्रार प्राप्त झाल्याने येथील विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाने फौजफाट्याच्या संरक्षणात फलक काढून टाकला. ही बाब शिवप्रेमींना समजताच, त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाचा निषेध नोंदवत विभागीय कार्यालयांच्या दालनात ठिय्या देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या. जोपर्यंत फलक सन्मानाने ठरलेल्या जागी लावत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

सिडको विभागीय कार्यालयात शिवप्रेमींचे आंदोलन 

वातावरण चिघळत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. ऐनवेळी छत्रपती शिवरायांचे वंशज असलेल्या सोनालीराजे पवार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलकांना शांत केले. त्यानंतर ज्येष्ठांच्या विनंतीला मान देत व नियम बाजूला ठेवत अधिकाऱ्यांनी फलक आंदोलकांच्या ताब्यात दिला. शिवप्रेमींनी हा फलक पुन्हा लावला. सोनालीराजे पवार व मामा ठाकरे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी विशाल डोके, संजय भामरे, देवा वाघमारे, अर्जुन वेताळ, आशिष अहिरे, विनोद भडांगे, सुनील जगताप, नाना ठोंबरे, प्रीतम भांबरे, नितीन माळी, अक्षय खंडारे, योगेश गांगुर्डे, जीवन सोनवणे, अजय पाटील, मदन जमदाडे, सुनील घुगे, सुनील ढाकणे, विनोद गोसावी आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, गैर काय? उपमहापौरांनी स्पष्ट केली भूमिका

Ujjain Temple: उज्जैनमध्ये आज 'चमत्कार'! पहाटे होणारी भस्म आरती आज दुपारी; वर्षातून फक्त एकदाच मिळते अशी संधी, पाहा काय आहे कारण

लाइफ बना दूँगा! रिलस्टार बनवण्याचं आमिष, १५ वर्षीय मुलीवर युट्यूबरचा लेकासह अत्याचार; दोघांना अटक

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT