नाशिक

मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असं कुठं म्हटलं?- संजय राऊत

कार्तिक पुजारी

नाशिक- शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणत असल्याचं पत्रकारांनी त्यांना सांगितलं. यावर संजय राऊत म्हणाले की, 'आम्ही कुठं म्हणतोय नाही येणार म्हणून. भाजप पक्षाचे ते नेते आहेत. आजही ते एक मोठे नेते आहेत. त्यांचा चेहरा मोठा आहे. विरोधीपक्षांनी एकत्र येऊन काही ताकद निर्माण केली तरच बरोबरीची लढत होऊ शकते.' (shivsena sanjay raut said about bjp pm narendra modi amit shah)

पश्चिम बंगालमधील पराभव केवळ भाजपचा नसून तो पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा आहे असं मीडिया म्हणते. तमिळनाडू, केरळमध्ये त्यांची जादू चालली नाही. त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही. राजकारण चंचल असतं. इंदिरा गांधींना, जवाहरलाल नेहरुंना , अटल बिहारी वाजपायींना राजकारण हातात ठेवता आलं नाही, असं संजय राऊत म्हणाले. भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला. आम्हाला दुय्यम लेखण्यात आलं. आता आम्ही मुख्यमंत्री आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीत गेले. शिवसेना भवन हे स्वाभिमानाचं प्रतिक आहे. स्वाभिमानाचं दुसरं नाव बाळासाहेब ठाकरे आहे, असंही ते म्हणाले.

प्रशांत किशोर-शरद पवार भेट

प्रशांत किशोर एक रणनीतीकार आहेत. त्यांची भेटी उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि माझ्यासोबत अनेकदा झाली आहे. त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यांची मदत सर्व पक्ष घेत असतात. त्यांनी भाजपसाठीही काम केलं आहे. शिवसेनेसाठीही काम केलंय. त्यामुळे प्रशांत किशोर-शरद पवारांच्या भेटीची जास्त चर्चा करण्याची गरज नाही. राजकीय विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांची भेट झाली असेल, असं राऊत म्हणाले.

वारीसंदर्भात संजय राऊत काय म्हणाले?

अजित पवारांनी याबाबत माहिती दिली आहे. सरकारने लोकांच्या आरोग्याचा विचार करुन निर्णय घेतलाय. लोकांच्या भावना जशा तीव्र आहेत, तसाच कोरोना विषाणू तीव्र आहे. लोकांचे प्राण महत्त्वाचे आहेत. मनावर दगड ठेवून सरकारने निर्णय घेतला आहे. काही लोकांना राजकीय पक्ष फुस लावत आहेत. वारकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. तिसरी लाट येण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांनी असं करावं, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT