Accidental Shivshahi bus esakal
नाशिक

Bus Accident : 'त्या' शिवशाहीच्या चालकाने मद्यपान केल्याचे उघड

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला मंगळवारी (ता.२५) सकाळी अकराच्या सुमारास सिन्नरजवळ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडकून हा अपघात झाला. दरम्यान चालक मद्यपान करून बस चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Shivshahi Bus Accident at nashik pune highway driver for Shivshahi apparently drunk Nashik News)

गुरेवाडी शिवारात हा अपघात झाला. नाशिकहून पुण्याला जाणारी शिवशाही बस ( एम.एच. १४ जी.डी. ८४४१) थेट दुभाजकावर चढली. या अपघातानंतर बसमधील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. ते इतर वाहनांनी निघून गेल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली. बसचालक राजू काशिनाथ पवार (३६, रा. कन्नड, जि. औरंगाबाद) याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले अशी माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. याप्रकरणी संशयित पवार याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार टेमनर तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

Balwan Punia: ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या यशामागचा आधारस्तंभ हरपला! वडील बलवान पुनिया यांचे निधन

SCROLL FOR NEXT