bytco hospital esakal
नाशिक

नाशिकच्या बिटको हॉस्पीटलची 'ही' घटनाही वाऱ्या‍सारखी पसरली!

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक रोड बिटको कोविड सेंटरच्या (bytco covid center) कॉम्प्रेसरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तीन व्हेंटिलेटर (ventilators) अचानक बंद झाले. ही घटना वाऱ्या‍सारखी पसरल्यानंतर पुन्हा बिटको कोविड सेंटर चर्चेला आले. पण त्यानंतर सत्य समोर येतात अनेकांच्या जीवात जीव आला...नेमके काय घडले? (Short-circuit -at-Bitco-Hospital-nashik-marathi-news)

नाशिकच्या बिटको हॉस्पीटलची 'ही' घटनाही वाऱ्या‍सारखी पसरली!

बिटको हॉस्पिटलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची वार्ता मंगळवारी (ता. १८) सायंकाळी वाऱ्यासारखी पसरली. या ठिकाणी नातेवाइकांनी चौकशीसाठी गर्दी केली. घटनेची माहिती समजताच महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सेंटरप्रमुख डॉ. आवेश पलोड, डॉ. जितेंद्र धनेश्वर आदींसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अतिदक्षता विभागाकडे धाव घेतली. व्हेंटिलेटरच्या कॉम्प्रेसरमधून धूर आल्याने तीन कॉम्प्रेसर मशिन काही काळाकरिता बंद पडली. मात्र ही बाब कर्तव्यावर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही यंत्रणा पुन्हा एकदा कार्यान्वित केली. बिटको कोविड सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या व्हेंटिलेटर कक्षामध्ये एकूण १६ व्हेंटिलेटर असून, त्यावर अनेक रुग्ण मृत्यूशी सामना करीत आहेत. दरम्यान, रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण दगावल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती

ती शेवटी अफवाच....

नाशिक रोड बिटको कोविड सेंटरच्या कॉम्प्रेसरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तीन व्हेंटिलेटर अचानक बंद झाले. ही घटना वाऱ्या‍सारखी पसरल्यानंतर पुन्हा बिटको कोविड सेंटर चर्चेला आले. मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, अशी माहिती डॉ. बापूराव नागरगोजे यांनी दिली.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी दिली. दरम्यान, रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण दगावल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. ती शेवटी अफवा असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT