Kids fasting Roja esakal
नाशिक

Ramzan Festival : चिमुकल्या रोजेदारांवर कौतुकाचा वर्षाव!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : चिमुकले रोजेदार यंदाच्या रमजान पर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणावर लहान मुलांकडून रोजा केला जात आहे. अगदी तीन ते सहा वयोगटातील मुलांचा समावेश आहे. मोठ्यांनाही कासावीस करून टाकणारे रोजे लहान मुलांकडून केले जात असल्याने सध्या त्यांच्याबद्दलच सर्वत्र चर्चा सुरू आहे. (shower of praise on little children Rojedar on Ramzan Festival 2023 nashik news)

यंदा १४ ते १५ तासांचा रोजा आहे. इतक्या तासांमध्ये निर्जल रोजा करणे, अतिशय जिकरीचे आहे. त्यात दिवसा कडाक्याचे ऊन जाणवत आहे. असे असताना कुठलीही चिंता न करता निर्धास्त चिमुकले रोजा करत आहे. अगदी ३ ते ६ वयोगटातील चिमुकल्याचादेखील रोजा करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

जुने नाशिक येथील महम्मद आदिल मेमन या तीनवर्षीय चिमुकल्याने रोजा करण्यात आला. त्याच्या रोजा करण्याने मेमन कुटुंबीयांच्या घरी ईदच्या महिनाभर पूर्वीच ईद साजरी झाली. सर्व कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रोजा इफ्तार पूर्वी नवे कपडे परिधान करून फुलांनी सजवून त्यास बडी दर्गा येथे दर्शनासाठी आणण्यात आले होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

त्याचे वय लक्षात घेता बडी दर्गा परिसरातील मुस्लिम बांधवांसह त्यांच्या आप्तसंबंधीयांनी त्याचे कौतुक केले. त्याचप्रमाणे पखाल रोड अशोका मार्ग भागातील माहीशा फातिमा या सहावर्षीय चिमुकलीने रोजा केला.

याचप्रमाणे विविध भागातील चिमुकल्यांकडून रोजा करण्यात येत असल्याने दैनंदिन त्यांचे पालक त्यांना सजवून बडी दर्गा येथे दर्शनासाठी घेऊन येताना दिसून येत आहे. दैनंदिन येणाऱ्या चिमुकल्यांची संख्या बघता या वर्षी लहान मुलांकडून रोजा करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGCAला उशिरा जाग, व्हीआयपींना सेवा देणाऱ्या देशातील १४ विमान कंपन्यांचं ऑडिट; यादी आली समोर

Hapus Mango Price : कोल्हापूर, सांगली मार्केटला हापूस आंबा दाखल, ६०० रुपयांना एक आंबा; हंगामात उच्चांकी भाव

Latest Marathi News Live Update : मंत्रालयात लक्ष्मीदर्शन, झिरवाळ राजीनामा द्या; विरोधकांचं विधानभवनाबाहेर आंदोलन

हनुमंत पवार मारहाण प्रकरणी तुषार दामगुडेंसह तिघांवर गुन्हा दाखल, पिस्तुल जप्त करून घरी सोडलं; अटक का नाही? कारण समोर

Agra Trip Budget: फक्त २००० रुपयांत पूर्ण होणार आग्रा ट्रिप! एका दिवसात पहा ताजमहाल आणि बरंच काही; पाहा कसं करायचं प्लॅनिंग

SCROLL FOR NEXT