Srirang copper esakal
नाशिक

Nashik Agriculture News : पिकांच्या डिजिटल सर्वेक्षणासाठी देवळ्याची निवड : श्रीरंग तांबे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Agriculture News : शेतपिकांच्या नोंदणीसाठी आता ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे ॲप वापरण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील ४६ गावांसह इतर तीन गावे अशा एकूण ४९ गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड झाली आहे.

यासोबतच राज्य सरकारच्या ई-पीकपाहणी अ‍ॅपमधून नोंदणी सुरू राहणार असल्याची माहिती पुण्याच्या भूमीअभिलेख विभागातील ई-पीकपाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी दिली.(Shrirang Tambe statement of Selection of devale village for digital survey corps nashik agriculture news)

‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ अ‍ॅपविषयी मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी (ता. २४) महाकवी कालिदास कलामंदिरात कार्यशाळा झाली. नाशिक विभागातील सर्व महसुली कर्मचारी या वेळी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा नाशिक प्रांत जितीन रहमान, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, भीमराज दराडे आदी उपस्थित होते.

श्रीरंग तांबे म्हणाले, की पीकविम्यातून दिली जाणारी भरपाई तसेच आपत्कालीन पीक परिस्थितीत शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत यांसाठी अचूक माहिती मिळावी, यासाठी केंद्र राज्य सरकारने ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे अ‍ॅप पीकपाहणीसाठी तयार केले आहे. राज्यातील १४९ गावांमध्ये याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू आहे.

त्यानुसार या गावांमध्ये पिकांखालील क्षेत्राची तसेच कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, याची अचूक नोंद होणार आहे. पुढील वर्षापासून राज्यात सर्व ठिकाणी याच अ‍ॅपमधून नोंदणी केली जाईल. त्यामुळे राज्यातील पेरणी खालील क्षेत्र किती आहे, याची अचूक माहिती मिळणे शक्य होणार आहे.

५० मीटरच्या आतील फोटो बंधनकारक

पूर्वीच्या अ‍ॅपमध्ये शेतीच्या प्रत्येक गट क्रमांकाच्या मध्यबिंदूपासून फोटो काढला जायचा. आता केंद्राच्या सूचनेनुसार सीमेपासून ५० मीटरपर्यंत जाणे बंधनकारक आहे; तरच पुढील माहिती भरता येईल.

याचाच अर्थ ५० मीटरपेक्षा जास्त अंतरावरून पिकाचा फोटो काढता येणार नाही. नव्या अ‍ॅपमध्ये पीकपाहणी करताना पिकांचे १०० टक्के फोटो उपलब्ध व्हावेत, अशी अट टाकण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

Reel star Akkya Bansode: “थांब, तुझा आज गेमच करतो...” पुण्यात रिल स्टारवर धारधार शस्त्राने कसा झाला हल्ला, कोण आहे अक्क्या बनसोडे?

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

SCROLL FOR NEXT