A snake found in the temple of Lord Mahadev. esakal
नाशिक

Nashik News : जागृत देवस्थान असलेल्या येवल्यातील शिवमंदिरात नागाचे दर्शन; श्रावणातील दर्शनामुळे कुतुहल

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जागृत देवस्थान असलेल्या शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये नागाने दर्शन दिले. श्रावणात झालेल्या या दर्शनामुळे हा कुतुहलाचा विषय मानला जात आहे.

भगवान महादेव व नागराज यांचे नाते काय आहे, हे अनेक ग्रंथात वाचत आलो आहोत. याबाबत अनेक ग्रंथात भरभरून लिहिले आहे. (sight of snake in Shiva temple in Yeola nashik news)

हे प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य आतापर्यंत फारच थोड्या लाकांना लाभले आहे. येवल्यातील श्री महामृत्युंजय मंदिरात सततचे होणारे नागराजाचे दर्शन येथील शिवभक्तांसाठी चमत्कारिक ठरत आहे.

अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये शुक्रवारी (ता. ११) दुपारी वडगाव येथील संदीप शिंदे दर्शनासाठी आले असता, त्यांना मंदिर गाभाऱ्यात नाग दिसताच. त्यांनी त्वरित स्थानिकांना सांगितले. सर्पमित्र दीपक सोनवणे यांना त्वरित मंदिरात बोलविण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या सर्पमित्राने मोठ्या शिताफीने नागास मंदिराच्या गाभाऱ्यातून ताब्यात घेऊन त्याला नैसर्गिक आदिवासात सोडून देण्यात आले. इंडियन कोब्रा जातीचा नाग असून, जवळपास चार ते साडेचार फूट लांबीचा सर्प असल्याची माहिती सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी दिली.

हे महादेव मंदिर शहरातील भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे. येथे प्रदोषला होणारी पूजा व अन्नदानासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती असते.

किंबहुना प्रदोष पूजा व अन्नदानासाठी पुढच्या अनेक दिवसांच्या तारखाही बुक झाल्या आहेत. अनेकांना येथे साक्षात्कारही झाल्याचे सांगितले जाते. त्यातच नागाच्या दर्शनामुळे भाविकांना आश्चर्य वाटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interpol Notices : रेड कॉर्नरपासून ब्लू कॉर्नरपर्यंत; इंटरपोल कधी अन् किती प्रकारच्या नोटीस जारी करते?

Whatsapp आणतंय खास फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच ओपन होणार Facebook, फेक अकाउंटला टाटा बाय बाय..कसं वापरायचं पाहा

Gaza Strip: उद्ध्वस्त घरे अन् अस्वस्थता; गाझा पट्टीत परतलेल्या हजारो पॅलेस्टिनींची भावना

Diwali Festival: बाजारपेठा गजबजल्‍या! दिवाळीच्या खरेदीची लगबग; आज गर्दी वाढणार

Nilesh Ghaiwal सोबत Rohit Pawar यांच्या आईचे फोटो, भाजपवर चांगलेच भडकले | Pune News | Sakal News

SCROLL FOR NEXT