kumbh mela latest marathi News esakal
नाशिक

Nashik Kumbh Mela: साधूंनाही हवा कुंभमेळा समितीत प्रवेश; आखाडाप्रमुखांची जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या कृती समित्यांमध्ये साधू-महंतांचा समावेश नसल्याने आखाडाप्रमुखांनी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. कृती समित्यांमध्ये साधूंना कसे सामावून घेता येईल, यादृष्टीने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.

नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यात देशभरातून येणारे भाविक, पर्यटकांसह साधू-महंतांची व्यवस्था करण्याची जबाबदारी नाशिक महापालिका व जिल्हा प्रशासनाची असते. (simhastha kumbh mela Sadhus also want enter in Kumbh Mela committee nashik news)

रस्ते, परिवहन, पाणीपुरवठा, राहण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, वीजपुरवठा आदी मूलभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असते. त्यादृष्टीने राज्य सरकारने गुरुवारी (ता. १४) शिखर समिती, उच्चाधिकार समिती, जिल्हास्तरीय समितीची घोषणा केली. या समित्यांमध्ये मंत्री व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

एकाही समितीत साधू-महंत आखाडा प्रमुखांचा समावेश का नाही, अशी विचारणा त्र्यंबकेश्वरच्या महंतांनी जिल्हाधिकारी शर्मा यांच्याकडे केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लागलीच २०१४ मधील कुंभमेळ्याचा कृती समितीचा शासन निर्णय पाहिला. त्यात एकाही साधू-महंताचा समावेश नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

मात्र, एवढ्या मोठ्या सोहळ्याच्या नियोजन समितीत साधू-महंत का नसावेत, अशी विचारणा त्यांना आखाडाप्रमुखांनी केल्याने आपण तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठठिणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुढील आठवड्यात पहिली बैठक

शासन निर्णयानंतर आता जिल्हाधिकारी शर्मा हे कुंभमेळा नियोजनासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेणार आहेत. या बैठकीत गेल्या वेळच्या कुंभमेळ्यात ज्या अधिकाऱ्यांनी प्रमुख भूमिका निभावली, त्यांच्यासह इतरही अधिकाऱ्यांना बोलावले जाणार आहे.

सिंहस्थासाठी स्वतंत्र कक्षाचा विचार

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्याचा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करून त्याला मंजुरी मिळाल्यावर तो कार्यान्वित केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Israel FTA : भारत-इस्राईल मैत्रीचे नवे पर्व सुरू, महाराष्ट्राला महासंधी; ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तींवर स्वाक्षरी

Parli Vaijnath News : सलग दुसऱ्या वेळा राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत आभा मुंडेंने केली पाच सुवर्णपदकांची कमाई

Pune News : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीची सहा तास कसून चौकशी

Pune Crime : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

Latest Marathi News Update LIVE : पंजाबमधील लुधियाना येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT