dineshkumar 
नाशिक

सलग ५१ दिवसांच्‍या गायनाच्‍या विक्रमाकडे 'त्यांची' वाटचाल; जाणून घ्या कोण आहे ते?

अरुण मलाणी

नाशिक : सलग एकावन्न दिवस गायनाचा नवीन विक्रम प्रस्‍थापित करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्‍यांच्‍या गायनाच्‍या विक्रमाचे फेसबुक लाइव्‍हद्वारे थेट प्रक्षेपण दाखविले जात आहे. आतापर्यंत त्‍यांनी २१ दिवसांचे गायन केले असून, पुढील तीस दिवस सलग गायन करणार आहेत.

२१ दिवसांत ५०४ तास सलग गायन

गायक दिनेशकुमार यांच्‍याआधी हा विक्रम चीनमधील गायकाने ७९२ तास गायन करून निर्माण केला आहे. त्यानंतर २०१७ मध्ये हा विक्रम भारतातील आठशे गायकांनी एक हजार तास गायन करून मोडला होता. हा विक्रम मोडण्याचा मानस दिनेशकुमार यांनी केला असून, आतापर्यंत २१ दिवसांत ५०४ तास सलग गायन केले आहे. आणखी तीस दिवस गायन करताना ते नवा जागतिक विक्रम प्रस्‍थापित करणार आहेत.

कुटुंबातील चार सदस्‍य त्‍यांच्‍यासोबत आहेत. त्‍यांच्‍या या गायनाचा कार्यक्रम फेसबुकवर dineshkumar51multivoice singer येथे सुरू आहे. हा कार्यक्रम २४ तास सुरू असून, संगीतप्रेमींनी संगीताचा आनंद अनुभवण्याचे आवाहन केले आहे. गुगल सर्चवर हा कार्यक्रम क्रमांक एकवर असल्‍याचा दावा त्‍यांनी केला आहे. यापूर्वीही त्‍यांनी २०१५ मध्ये सलग २९ तास गायनाचा विक्रम नोंदविला आहे.

संपादन : रमेश चौधरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT